आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब मेमनच्या फाशीवरून जुंपली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई बाॅम्बस्फाेटांतील आरोपी याकूब मेमन याला फाशीएेवजी जन्मठेप देण्याची मागणी करणारे निवेदन स्थानिक ‘एमअायएम’चे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे पाठवले. याला प्रखर विरोध करत दयेची याचिका पाठवणाऱ्यांविरुद्ध प्रहार संघटनेतर्फे राजकमल चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. तर दुसरीकडे झाेपडपट्टी बचावसाठी मानवी हक्क संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला.
‘एअायएमअायएम’च्या निवेदनावर‘प्रहार’ संतप्त; झाेपडपट्टी बचावसाठी ‘मानवी हक्क’चा आंदोलनाचा पवित्रा
अमरावती
मुंबईबाॅम्बस्फाेटांतील अाराेपी याकूब मेमनला ३० जुलै राेजी फाशी देण्यात येणार असून, त्याला फाशीएेवजी जन्मठेपेची िशक्षा सुनावली जावी, अशी मागणी अाॅल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिम (एअायएमअायएम)ने निवेदनाद्वारे केली अाहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या राज्यपालांना यासंदर्भातील निवेदन पाठवण्यात अाले असून, १९९२ मध्ये झालेल्या दंगलीतील दाेषींना अाधी शिक्षा दिली जावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात अाली अाहे. याचसाेबत श्रीकृष्ण कमिशनने सुचवलेल्या महत्त्वाच्या बदलांची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात अाली अाहे.

याकूबने भारतीय गुप्तचर संस्थेपुढे शरणागती पत्करत मुंबई बॉम्बस्फाेटांच्या चाैकशीत महत्त्वपूर्ण सहकार्य केले अाहे, असे असतानाही त्याला फाशी िदली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात अाले अाहे. निवेदनावर एअायएमआयएमच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी अाहेत. तर मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकुब मेमन याला न्यायालयाने फाशीची शिक्षा यापूर्वीच सुनावलेली आहे.
अमरावती संजयगांधी, श्रावण बाळ याेजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे मानधन वेळेवर देण्यात यावे, तसेच प्रशासकीय बेजबाबदारपणामुळे लाभार्थ्यांना मानधन मिळत नसल्याची तक्रार करत िशवसेना उप शहरप्रमुख अमाेल निस्ताने,माेहन क्षीरसागर, उत्तम रामधन, श्रीधर कुटे अादींनी साेमवारी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. मागील काही दिवसांपासून संजय गांधी, श्रावण बाळ याेजनेतील लाभार्थ्यांचे मानधन त्यांच्या बँकेत जमा हाेत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात अाले अाहे.
सर्वोच्च न्यायालयाने याकूब मेननला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेचा विरोध करून देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दयेची याचिका पाठवणाऱ्या लोकांविरुद्ध प्रहार संघटनेतर्फे सोमवार, २७ जुलैला जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात आले. राजकमल चौकात मोठ्या फलकासमोर प्रहारतर्फे हे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. फलकाला चप्पलांची माळ शाई लावून कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. चौकात कार्यकर्त्यांनी प्रचंड नारेबाजी करून अनेकांचे लक्ष वेधले. या वेळी प्रहार संघटनेचे धीरज जयस्वाल, छोटू महाराज वसू तथा प्रहार संघटनेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, प्रहारचे हे आंदोलन बघण्यासाठी नागरिकांनी राजकमल चौकात गर्दी केली होती. परंतु, पोलिसांचा बंदोबस्तही चोख असल्याने पोलिसांनी या नागरिकांना हटवत रस्ता मोकळा केला. याकूब मेननला सुनावलेली फाशी रद्द केली जावी, यासंदर्भात देशातील नेते, अभिनेता वकिली व्यवसायातील नामांकित व्यक्तींनी राष्ट्रपतीला दया याचिका पाठवली आहे. यावर संतप्त प्रहार संघटनेने याला विरोध दर्शवला अाहे. सर्वप्रथम प्रहारचे कार्यकर्ते चौकात जमले होते. त्यांनी मेननच्या फाशीसाठी दया मागणाऱ्यांचा निषेध केला.
अमरावती न्यूबजरंगनगर परिसरात बांधलेल्या झाेपडपट्टी झाेपडपट्टीधारकांचा सर्व्हे करून त्या परिसरातील नागरिकांना नागरी सुविधा पुरवून पक्की झाेपडपट्टी बांधून देण्यात यावी, अन्यथा झाेपडपट्टी बचाव अांदाेलन करण्यात येईल, असा इशारा मानवी हक्क सुरक्षा दल-विदर्भ प्रदेशने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला अाहे. झाेपडपट्टी परिसरातील नागरिकांना नागरी सुविधा पुरवल्या जाव्यात, झाेपडीत राहणाऱ्या व्यक्तीच्या संख्येसह झाेपडपट्टीनहाय सर्वेक्षण केले जावे. या मागण्या मान्य केल्यास झाेपडपट्टी बचाव अांदाेलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष जगदीशकुमार इंगळे यांनी दिला अाहे.

आरोपी याकूब मेमन याला झालेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यासाठी लावलेल्या फलकावरील चेहऱ्यांना शाईचे काळे फासताना प्रहारचे कार्यकर्ते.
मुंबई बाॅम्बस्फाेटांतील आरोपी याकूब मेमन याला फाशीएेवजी जन्मठेप देण्याची मागणी करणारे निवेदन दाखवताना ‘एमअायएम’चे पदाधिकारी कार्यकर्ते.