आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ निकाल देईना अन् महाविद्यालय प्रवेश, अमरावती विद्यापीठाचा प्रताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद- ‘आई जेवायला देईना अन् बाप भिक मागू देईना’ या उत्कीला तंतोतंत लागू पडणारा प्रकार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने बीकॉमच्या विद्यार्थ्यांसोबत घडवला आहे. विद्यापीठाने बी.कॉम भाग दोन वर्षाचा निकाल रोखून धरल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विदर्भ अगोदरच शिक्षणाच्या क्षेत्रातही मागासलेलाच आहे. येथे मिळते त्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ ऑनलाईन झाले असतानाही अमरावती विद्यापीठ आजही माघारलेलेच असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच अमरावती विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील महाविद्यालयांना सध्या अडवणुकीच्या धोरणांचा वेगळाच अनुभव येऊ लागला आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांचे बी.कॉम.
भाग दोन वर्षाचे निकाल विद्यापीठाने रोखले आहेत. ऑफिसिअल व्हेरिफीकेशनच्या अथवा तांत्रिक अडचणीच्या नावाखाली अडवण्यात आलेल्या गुणपत्रिकांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. २० जूनपासून महाविद्यालयांना सुरुवात झाली.

दुसरीकडे इतर वर्गांचे निकालही ऑनलाईन लागले. सोबतच गुणपत्रिका हातातही पडल्या बी.कॉम, बी.ए., बी.एस्सी. च्या प्रथम वर्षात प्रवेशही घेतले आहे. तर बी.ए.,बी.कॉम. बी.एस्सी भाग एकचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला आहे. सध्या विद्यापीठाकडून बी.कॉ. भाग दोनचा निकाल रोखून धरून ठेवल्याने पुढील वर्गात प्रवेश घेण्याची वाट विद्यार्थी पाहत आहे. जर गुणपत्रिका देता येत नसेल तर ऑनलाईन निकाल जाहिर करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. विद्यापीठाच्या मनमर्जी कारभारने विद्यार्थी संभ्रमात पडले असून निकाल पास कि नापास या भ्रमात आहे. या संबंधी स्थानिकच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबत विचारणा केली असता महाविद्यालयही निकालाच्या प्रतीक्षेतच असल्याचे सांगितल्या जात आहे.
१५ ऑगस्टपूर्वी निकाल दिल्यास आंदोलन करू
- अमरावती विद्यापीठाने ठरलेल्या वेळेत निकाल जाहिर केला नाही. सध्या महाविद्यालये सुरू झाले असून अभ्यासक्रमास सुरुवात केली आहे. आम्ही पास कि नापास या संभ्रमात आहोत. निकाल लागत नसल्यामुळे महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही त्यामुळे जर विद्यापीठाने १५ ऑगस्ट पूर्वी निकाल दिल्यास आम्ही विद्यार्थी आंदोलन करू.'
बादल राठोड, विद्यापीठ प्रतिनिधी, पुसद