आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ZP Teachers Bank cost Deputy Chairman Selection Monday

जि. प. शिक्षक बँक अध्यक्ष-उपाध्यक्षांची सोमवारी निवड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड साेमवार २३ नोव्हेंबरला होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी गौतम वालदे यांच्याकडून याबाबत आज (१६ नोव्हेंबर) निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. प्रगती पॅनलचे सर्वाधिक संचालक निवडून आले असले तरी अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर कोण बाजी मारणार याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत पाच संघटना मिळून प्रगती पॅनल निर्माण करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक सेना, उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक महामंडळ जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा समावेश आहे. या पाच संघटनांपैकी सर्वाधिक संचालक अखिल भारतीय शिक्षक समितीचे निवडून आले आहे. दहा संचालक निवडून अाल्याने अध्यक्ष पदाची माळ शिक्षक समितीला मिळेल यात शंका नाही. मात्र, पॅनलमध्ये एकत्रपणे निवडून आल्याने अन्य संघटनांकडून अध्यक्ष पदाची मागणी होण्याची शक्यता आहे. प्रगती पॅनलचे समन्वयक गोकूळ राऊत अध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, शिक्षक सेनेकडून देखील अध्यक्ष पदाबाबत रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे. अध्यक्ष पद एका संघटनेला मिळाल्यानंतर उपाध्यक्ष पद उर्वरित चार संघटनेतील संचालकांना मिळावे म्हणून प्रयत्न केल्या जात आहे. मात्र, शिक्षक समितीचे सर्वाधिक संचालक असल्याने तसेच प्रगती पॅनलच्या विजयी घोडदौडीत महत्त्वपूर्ण भूमिका असलेले राजेश सावरकर यांच्या पत्नी अर्चना सावरकर यांना उपाध्यक्ष पद मिळावे म्हणून प्रयत्न होत आहे. शिवाय प्रत्येक वर्षी उपाध्यक्ष पद देण्याबाबत पर्याय असल्याची माहिती आहे.
नामांकन स्वीकारणे दु. ते १.१५
नामांकन यादी प्रसिद्ध दु. १.१५
नामांकन छाननी दु. १.१५ ते १.३०
वैध अर्ज यादी प्रसिद्ध दु.१.३०
नामांकन मागे दु.१.३० ते १.३५
अंतिम यादी दु. १.३५
गरज पडल्यास मतदान दु.१.४० ते
मतदानानंतर मतमोजणी,
मतमोजणीनंतर निकाल
संघटनानिहाय संख्याबळ
महाराष्ट्रराज्य प्राथमिक शिक्षक समिती १०
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना
महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळ संघटना
महाराष्ट्र राज्य जि. प. कर्मचारी युनियन
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ
पदवीधर शिक्षक केंद्र प्रमुख सभा
कास्ट्राइब शिक्षक संघटना
युवा शक्ती