आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवालांच्या \'जय जिजाऊ\'साठी अखेर परवानगी, सकाळी केले होते मराठीत ट्वीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपनेते अरविंद केजरीवाल हे जिजाऊ जयंतीला म्हणजेच 12 जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे येणार आहेत. या ठिकाणी राजमाता जिजाऊंना वंदन केल्यानंतर अरविंद केजरीवाल महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. सुरुवातीला सुरक्षेच्या कारणावरून केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र आता त्यांना या सभेसाठी परवानगी मिळाल्याची बातमी येत आहे. 

 

छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचे दैवत असलेल्या राजमाता जिजाऊंवरही संपूर्ण महाराष्ट्राची निष्ठा आहे. त्यांच्या जयंतीच्या दिवशी जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथे मोठ्या संख्येने राज्यातील बांधव जमत असतात. याठिकाणी होणारी गर्दी पाहता आपने या ठिकाणाहूनच 2019 च्या निवडणुकांचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 12 जानेवारीला केजरीवाल याठिकाणी येतील असे जाहीर करण्यात आले. पण भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती लक्षात घेता, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. तरीही केजरीवाल यांनी मंगळवारी सकाळी मराठीत एक ट्वीट करत आपण सिंदखेड राजाला येणार असल्याचे स्पष्ट केले होते. 

 

पुढे पाहा, केजरीवालांनी केलेल ट्वीट...

 

बातम्या आणखी आहेत...