आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटानंतर कोर्टासमोरच नातेवाईंकात झाली हाणामारी, धारदार शस्त्राने केले एकमेंकावर वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- घटस्फोटानंतर नातेवाइकात हाणामारी होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास खामगाव येथील कोर्टासमोर घडली. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील भालेगाव बाजार येथील शारीक खान लालाखान यांची बहिणीचा विवाह रियाज खान युनूस खान रा देऊळगाव साकरशा हल्ली मुक्काम पुणे यांच्या सोबत झाला होता. आज गुरुवारी खामगाव येथील न्यायालयात त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यानंतर नांदुरा रोडवरील कोर्टाबाहेर मुली व मुलगा या दोन्ही नातेवाईकामध्ये धारदार शस्त्राने हाणामारी झाली. 

 

यामध्ये शारीक खान लाला खान, बिस्मिल्ला खान जकाऊला खान, मुश्ताकखान जकाऊलाखान सर्व रा. भालेगाव तसेच अमान खान हुसेन खान, अयाज खान युनूस खान दोघे रा. पुणे यांना जखमी अवस्थेत स्थानिक सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामधील शारीक खान व बिस्मिल्ला खान यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ अकोला हलवण्यात आले. याप्रकरणी दोन्ही पार्टी कडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
  

बातम्या आणखी आहेत...