आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या दिशेने येणारा ट्रक अॅम्ब्युलन्सवर धडकला; रुग्णासह चार ठार, पाच गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- चुकीच्या दिशेने येणारा ट्रक अॅम्ब्युलन्सवर धडकून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.  अॅम्ब्युलन्स चालक गजानन सदार हा फरार आहे.

 

नागपूर- अमरावती महामार्गावर आज (सोमवार) हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण आहे की, अॅम्ब्युलन्सचा अक्षरश: चुराडा झाला आहे.  अॅम्ब्युलन्स अकोल्याहून जात होती. भालेराव दाम्पत्य आपल्या 12 वर्षाच्या मुलाला हॉस्पिटलला घेऊन जात होते. मृतांमध्ये आई, रुग्ण मुलाचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

 

आकाश भालेराव (वय-14), विमल भालेराव (आई), प्रमोद बंड, श्रीराम धारपावर अशी मृतांची नावे आहेत. सगळे अकोला जिल्ह्यातील आगर गावातील रहिवासी आहेत.

 

किसन अम्बादास बावने, लक्ष्मी किसन बावने, अंबादास राजाराम बावने, रामेश्वर भालेराव हे अपघातात जखमी झाले आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक पाहा.. अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...