आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: वरुडमध्ये बँकेमधून सव्वा लाख उडवले, शहरात एसबीआयतून 1 लाख 90 हजार लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड - बँकेतून रकमा उडवण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, वरुड पोलिस ठाण्याअंतर्गत दोन विविध घटनांमध्ये दोन खात्यातून सुमारे 1 लाख २४ हजार रुपये उडवल्याच्या घटना मंगळवारी ३१ ऑक्टोबरला उघडकीस आल्या. 
 
जरूड येथील स्टेट बॅक शाखेत असलेल्या महिलेच्या खात्यातून अज्ञात इसमाने लाख हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. ३१) उघडकीस आली. बेनोडा येथील अर्चना प्रभाकर कचवे यांचे जरूड येथील स्टेट बँकेत खाते आहे. या खात्यातून अज्ञात इसमाने २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास खात्यातून 1 लाख 7 हजार रुपये काढले. कचवे यांच्या तक्रारीवरून मंगळवारी वरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत नोकरीचे आमिष दाखवून स्टेट बॅक युनियन बँकेच्या एटीएम कार्डचा क्रमांक विचारून युवतीच्या खात्यातील १७ हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. ३१) सायंकाळी उघडकीस आली. वरुड येथील शिवाजी नगरातील रहिवाशी हर्षलता मनोहर पांडे या युवतीने नोकरीसाठी ‘शाईन’ वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले होते. त्यानंतर हर्षलताला मोबाईलवरून फोन आला नोकरीच्या रजीस्ट्रेशनसाठी शुल्क भरावे लागतात असे सांगितले. त्यामुळे ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी फोनकर्त्याने हर्षलताला स्टेट बंॅक युनियन बंॅकेच्या एटीएमचा क्रमांक विचारला ऑनलाईन १७ हजार रुपये उडवले. हर्षलताने याबाबत दाखल केलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध फसवणुकाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
शहरात एसबीआयतून 1 लाख 90 हजार उडवले 
विविध बँकातील खात्यातून ऑनलाईन रकमा उडविण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून शहरातील तीन एसबीआय शाखेतून ग्राहकांच्या सुमारे लाख ९० हजार ५०० रुपये उडवल्याच्या घटना मंगळवारी उघडकीस आल्या. सोनल कॉलनीतील रहिवाशी सुधाकर दशरथ पन्नासे यांचे गाडगेनगर एसबीआय शाखेत खाते आहे. दरम्यान सोमवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास दिल्ली येथून १६ हजार ५०० रुपये काढण्यात आल्याचा संदेश पन्नासे यांच्या मोबाईलवर आला. त्यानंतर पन्नासे यांच्या तक्रारीवरून मंगळवारी गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत नमुना गल्ली क्रमांक मधील रहिवाशी राजू तुकाराम बनारसे यांचे बियाणी चौकातील एसबीआय शाखेत खाते आहे. सोमवारी (दि. ३०) मध्यरात्रीच्या सुमारास बनारसे यांना तीन टप्प्यात लाख ६० हजार रुपये काढल्याचा मोबाईलवर संदेश आला. तिसऱ्या घटनेत संजय भगवान इंगळे यांच्या एसबीआयच्या कॅम्प शाखेतील खात्यातून १४ हजार ४६९ रुपये अज्ञात चोरट्याने खात्यातून उडवले. या तिनही घटनेची नोंद गाडगेनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...