आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलर चरख्यावर १० हजार मीटर कापड निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने अमरावती जिल्ह्यात सुरू केलेल्या सोलर चरखा प्रकल्पातून आतापर्यंत १० हजार मीटर कापडाची निर्मिती करण्यात आली आहे. निर्मित केलेल्या या कापडापासून दुपट्टे, शाली आणि शर्ट यांसारख्या उपयोगी वस्तूंचे उत्पादनही घेण्यात आले आहे. विदर्भात शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी ‘सोलर चरखा’द्वारे सूत काढण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अमरावतीत साकारण्यात आला आहे. विशेषत: कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये चरखाद्वारे सूत उत्पादन करून लाभार्थी महिलांना रोजगाराचे नवे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अमरावती जिल्ह्यात सुरू केला. सोलर चरखा प्रकल्पामध्ये जिल्ह्यात आणखी सात गावांत सोलर चरखा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. दाभा, बेलोरा (नांदगाव खंडेश्वर), वणी बेलखेड, बेलोरा (चांदूर बाजार), अंबाडा (मोर्शी), शिवणगाव (तिवसा), रामतीर्थ (दर्यापूर), असे एकूण १३ गावांत १३० चरखे कार्यान्वित झाले आहेत. या चरख्यांच्या माध्यमातून सद्य:स्थितीत चार हजार किलो प्रती महिना सुताचे उत्पादन सुरू झाले आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठी, मराठवाड्यातील नांदेड तसेच लोधीखेडा (मध्य प्रदेश) येथील हातमागातून कापड निर्मिती करण्यास प्रायोगिक तत्त्वावर खादी ग्रामोद्योग मंडळाने सुरुवात केलेली आहे, अशी माहिती जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे उर्वरित.पान
याच सोलर चरख्याच्या माध्यमातून १० हजार मीटर कापडाची निर्मिती करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...