आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ नराधमाला दहा वर्षांची शिक्षा,१४ वर्षांच्या कुमारिकेवर लादले होते मातृत्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सव्वा वर्षांपूर्वी अवघ्या १४ वर्षांच्या कुमारिकेवर बळजबरी मातृत्व लादणाऱ्या २४ वर्षीय नराधमाला येथील जिल्हा सत्र न्यायाधीश (क्रमांक ३) यांच्या न्यायालयाने गुरूवारी (दि. १५) १० वर्षांची कैद ६५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
नज्जू ऊर्फ नाजीर खान पीर खान (२४, रा. झाडा, ता. धामणगाव रेल्वे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. नज्जू हा कुल्फी विकण्यासाठी परिसरातील गावोगावी फिरायचा. दरम्यान, त्याची ओळख एका १४ वर्षीय कुमारिकेसोबत झाली. नज्जूने या कुमारिकेला धमकावून वारंवार बलात्कार केला. या प्रकरणी युवतीने २३ मे २०१५ ला मंगरुळ दस्तगीर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी नज्जूविरुध्द बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार कलम तसेच अॅट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वी दीड वर्षांपासून नज्जूने अत्याचार केल्याचे कुमारिकेने तक्रारीत नमूद केले होते. पीडित कुमारी ही चौदा वर्षांची हाेती त्यावेळपासून नज्जूने तिच्यावर अत्याचार केला.यातच तिला गर्भधारणा झाली. ही बाब कुमारीने नज्जूला सांगितली तर त्याने तिला गर्भपात करण्यासाठी गोळ्या देऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकाराची कोठेही वाच्यता केली तर ठार मारुन टाकेल, अशी धमकी दिली होती. त्यामुळे ही पीडितेने याबद्दल कोणाकडेही बोलत नव्हती. दरम्यान तिची प्रकृती खालावली असल्यामुळे तिला नागपूरला दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. उपचारादरम्यान त्या बाळाचा २८ मे २०१५ ला मृत्यू झाला. त्याचवेळी पोलिसांनी सदर बाळ, पीडित कुमारी माता आणि नज्जूच्या नमुन्यांवरून डिएनए चाचणी केली होती. सदर बालकाचे आई वडील पीडित कुमारी माता नज्जू असल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते. त्यामुळे नज्जूने अत्याचार केल्याचे पुढे आले होते. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने तीन साक्षिदार तपासले. नज्जूविरुध्द गुन्हा सिध्द झाला.
बातम्या आणखी आहेत...