आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 Percent Peoples Getting Heart Attack In Age Of 40

चाळिशीतच ११% लोकांना पहिला हार्टअटॅक, आजारांचा आर्थिक बोजा वाढतोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - देशातील साठ टक्के मृत्यू जीवनशैलीशी निगडित असंसर्गजन्य आजारांपायी होत असून अकरा टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना चाळिशीतच पहिला हृदयविकाराचा झटका (हार्टअटॅक) येतोय. यामुळे देशाला जगाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पादनक्षम मनुष्य तास गमवावे लागत असल्याचे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.

सीएसईच्या स्टेट ऑफ इंडियाज हेल्थ अहवालानुसार देशात हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह, कर्करोग, श्वसनाचे गंभीर आजार वाढत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण, बदललेली जीवनशैली, खानपानाच्या बदलत्या सवयी, तणाव यामुळे देशापुढे असंसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणण्याचे आव्हान आहे. देशातील ११ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना चाळिशीतच पहिला हार्टअटॅक येतो. जागतिक तुलनेत हे प्रमाण ६ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या असंसर्गजन्य आजार विभागाच्या सहसचिव अंशू प्रकाश यांनी सांगितले, इतर देशांची तुलना केल्यास भारताला हृदयाच्या आजारांमुळे उत्पादनक्षम लोकसंख्येचे (वय ३५ ते ६४ वर्षे) सर्वाधिक मानवी तास गमवावे लागत आहेत. आपण २००० मध्ये ९.२ दशलक्ष वर्षे गमावली, २०३० पर्यंत हा आकडा १७.९ दशलक्ष पर्यंत जाईल. अमेरिकेशी तुलना केल्यास हा तोटा ९४०% जास्त आहे. हृदयविकाराचा रुग्ण प्रत्येक भेटीत सरासरी ४८५ रुपये खर्च करतो.

चीनचे यश
१९८० च्या मध्यात चीनमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार हे मृत्यूचे प्रमुख कारण होते. ते कमी करण्यासाठी चीनने तियानजीन कार्यक्रम राबवला आणि १९८९-१९९२ दरम्यान हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण १५% कमी केले.

जीडीपीचे नुकसान
असंसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या नुकसानीचा विश्वसनीय डेटा आपल्याकडे उपलब्ध नाही. मात्र, यामुळे विकसनशील देशांना सकल राष्ट्रीय उत्पादनात दरवर्षी कमाल ७% तोटा होतो.'
डॉ. के. श्रीनाथ रेड्डी, अध्यक्ष, पब्लिक, हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया