आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ११ हजार जागांकरिता अकरावीची प्रवेश प्रक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया गुरुवार १६ जूनपासून आरंभ होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस.बी. लोहिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्व प्रथम कॅम्पस अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार असून त्यानंतर २० जूनपासून सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.
अमरावती शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य विज्ञान शाखा मिळून एकूण ११ हजार ७० जागांवर अकरावीचे प्रवेश दिले जाणार आहे. केंद्रीय प्रवेश समितीने त्याकरिता कार्यक्रम निश्चित केला आहे. सर्व प्रथम कॅम्पस अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार असून त्याकरिता प्रवेश अर्ज १६ जून ते १८ जून दरम्यान शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध होणार आहे. हे प्रवेश कनिष्ठ महाविद्यालय तसेच ब्रिजलाल बियाणी, केशरबाई लाहोटी महिला महाविद्यालयात होणार आहे. कॅम्पस अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर अन्य सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सोमवार २० ते २४ जून दरम्यान शहरातील ११ केंद्रांवर मिळणार आहे. ६० रुपयाला प्रवेश अर्ज मिळणार असून विलंब शुल्कासह शनिवार २५ जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

सर्व प्रथम विशेष राखीव संवर्ग (आजी-माजी सैनिक, अपंग, बदली कर्मचारी पाल्य, स्वातंत्र सैनिक पाल्य, खेळाडू) यांची प्रवेश यादी जुलैला ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात प्रसिद्ध होणार आहे. या संवर्गाचे अर्ज रेल्वे स्टेशन रोड स्थित खोडके कॉम्प्युटर्स येथे स्वीकारले जाणार आहे. सर्व साधारण गुणवत्ता यादी ११ जुलै रोजी मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयय, श्री शिवाजी विज्ञान महाविद्याल, ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय, नरसम्मा महाविद्यालय, विदर्भ महाविद्यालय बडनेरा येथील आरडीआयके महाविद्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीतील प्रवेश १२ ते १४ जुलै दरम्यान केले जातील. व्यवस्थापन संवर्गातील प्रवेश कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर १५ १६ जुलै रोजी होणार आहे. मागील वर्षी तब्बल ९२३ जागा शिल्लक राहिल्या होत्या, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याचे डॉ. लोहिया यांनी स्पष्ट केले.

यावेळी केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. एस. बी. लोहिया, सचिव प्रा. अरविंद मंगळे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल चितलिया, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही. जी. ठाकरे, प्राचार्य डाॅ. एफ. सी. रघुवंशी, प्राचार्य डॉ. आर. डी. देशमुख, प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, प्राचार्य पी. एम. दिवे, प्राचार्य डॉ. माधवी मांगरूळकर, प्रा. फैजान इकबाल उपस्थित होते.

प्रवेश अर्ज भरण्याचे ११ केंद्र
अमरावती शहरामधील मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, भारतीय महाविद्यालय, महिला महाविद्यालय, नरसम्मा महाविद्यालय, आरडीआयके महाविद्यालय बडनेरा, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, मणिबाई गुजराती हायस्कूल, रामकृष्ण विद्यालय, उर्दू सैफी हायस्कूल.