आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायमांची पदावनती; १२ शिक्षण सेवकांची भरती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यात बाेगस विद्यार्थीं अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे शासनाने शिक्षक भरतीला बंदी केली. मात्र मुंबई, काेकणच्या काही शाळांमध्ये नववी-दहावीला शिकवायला शिक्षक नाहीत, ही बाब समाेर आल्यावर शिक्षण विभागाने शिक्षक भरती बंदी अंशतः शिथिल करून गणित, विज्ञान इंग्रजी विषय शिक्षक भरण्याची अपवादात्मक परिस्थितीत परवानगी दिली हाेती. या परिस्थितीचा नूतन विदर्भ मंडळाने पुरेपूर फायदा घेऊन संस्थेतील माध्यमिक शिक्षकांची प्राथमिक शिक्षक पदावर पदानवती (डिमोशन) करून नववी, दहावीच्या वर्गावर कृत्रीम पदनिर्मिती केली शासनाची दिशाभूल करून १२ शिक्षण सेवकांची नियुक्ती केल्याचे उघड झाल्याने शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या अवैध ठरण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.

आघाडी सरकारने खासगी अनुदानित शाळांमधील बाेगस विद्यार्थांचा गाेरखधंदा उघडकीस आणला. या विद्यार्थांच्या भरवशावर हजाराे अतिरिक्त शिक्षकांची भरती झाली, ही बाब लक्षात आल्याने शासनाने मे २०१२ राेजी शिक्षक भरतीवर बंदी आणली. या बंदीनंतर मुंबई, ठाणे, काेकण विभागात नववी, दहावीच्या विद्यार्थांना शिकवायला शिक्षक नाहीत, ही बाब समाेर आली. शासनाने नववी, दहावीच्या विद्यार्थांची गैरसोय दूर करण्यासाठी शिक्षक बंदी अंशतः उठविली. गणित, विज्ञान इंग्रजी विषयाच्या शिक्षकांच्या भरतीला अपवादात्मक परिस्थितीत मान्यता देण्याचा निर्णय जाहीर केला. शासनाच्या या भूमिकेचा पुरेपुर गैरफायदा नूतन विदर्भ शिक्षण मंडळाने उचलला. नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या न्यू हायस्कूल मेन, नूतन कन्या शाळा न्यू हायस्कूल बेलपुरा या शाळांमध्ये इयत्ता नववी, दहावीला शिकविणारे शिक्षक अतिरिक्त हाेते. त्यामुळे या संस्थेला शिक्षकांची गरज नव्हती. तरीही “लक्ष्मी दर्शनाच्या’ लालसेने संस्थेच्या तीनही शाळेत कार्यरत कायम मान्यता प्राप्त अनुदानित माध्यमिक शिक्षकांची प्राथमिक शिक्षक म्हणून दर्जा वर्गावर गाेपनिय पद्धतीने पदानवती(डिमोशन)केले. इयत्ता नववी, दहावीला शिकविणारे डाखाेळे, देशपांडे, जहागिरदार, पिंपळकर, पुनसे यांच्यासह तब्बल १२ शिक्षकांवर अन्याय करीत त्यांचे डिमोशन केले इयत्ता नववी, दहावीवर १२ जागांची कृत्रिम निर्मीती केली. पगारपत्रकात शिक्षकांचे डिमोशन झाले, ही बाब लपवून ठेवण्यात आली. मात्र एका शिक्षिकेने सचिव निनाद साेमण यांच्याकडे या प्रकाराविषयी विचारणा केली तेव्हा गप्प रहा, असा दम भरला. संस्थेतील कायम शिक्षकांचा बळी देऊन, त्यांचे भविष्यात माेठे आर्थिक सेवा संरक्षणाचे नुकसान हाेण्याची शक्यता आहे. शासनाच्या नव्या आकृतीबंधानुसार सहावी ते आठवीचे वर्ग प्राथमिक शाळेचे वर्ग समजल्या जातात, तर नववी, दहावीच्या वर्ग माध्यमिक शाळेचे आहेत. नूतन विदर्भ मंडळाने १२ शिक्षण सेवकांची भरती करताना संस्थेच्याच कायम शिक्षकांचा बळी दिला आहे तर इयत्ता सहावी तेे आठवीची विद्यार्थी संख्या फुगवून दाखविली आहे. शिक्षण सेवकांची नियुक्ती करताना शासनाला बनावट कागदपत्रे सादर केल्याची शक्यता असून नियुक्त शिक्षण सेवकांचीही संस्थेने फसवणूक केल्याची शंका शिक्षकांच्या मनात आहे. अवैध शिक्षण सेवकांच्या नियुक्त्यांची शिक्षण विभाग कधी चाैकशी करणार, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

नूतनच्यासचिव, सहसचिवांची शिक्षकांवर “दबंगगिरी”: नूतनविदर्भ शिक्षण मंडळाने १२ शिक्षण सेवकांच्या अवैधरित्या नियुक्त्या केल्याचे प्रकरण समाेर येताच संस्थेचे सचिव निनाद साेमण सहसचिव प्रदीप पात्रीकर यांचा तीळपापड झाला आहे. दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केल्यावर संस्थेच्या दिवसरात्र बैठकी हाेत असून, या प्रकरणातील बनवाबनवी समाजासमाेर उघड हाेऊ नये यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू आहेत. एका दिवसात १२ शिक्षण सेवकांना मान्यता देणारे शिक्षणाधिकारी राठाेड गप्प असून त्यांच्याही चाैकशीचे आदेश निघू शकतात,असे सूत्रांनी सांगितले. संस्थेचे अवैध व्यवहार उघड झाल्याने शिक्षक विरोधात जाऊ नये, म्हणून नूतन कन्या शाळेत सहसचिव प्रदीप पात्रीकर यांनी शिक्षकांची सभा घेतली. या सभेत पाहून घेण्याची भाषा बाेलल्याचे सांगण्यात येत आहे. न्यू हायस्कूल मेनमध्ये सचिव निनाद साेमण यांनी सभा घेतली. त्यांनीही दबंगगीरीची भाषा केली. या नियुक्ती प्रकरणातील सगळी बनवाबनवी साेमण पात्रीकर यांचीच असावी, असा अमरावतीकरांना संशय आहे. संस्थेचे इतर संचालक या घाेट्याळ्याचे भागीदार हाेतात काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...