आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी जप्त केला १२ लाखांचा गुटखा, आरोपी अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरखेड- विदर्भातून मराठवाड्यात जाणारा लाखो रूपयांचा गुटखा आज, २० ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास हरदडा ते ब्राम्हणगाव दरम्यान वाहनांचा पाठलाग करून उमरखेड पोलिसांनी पकडला. तब्बल बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

उमरखेडमार्गे मराठवाड्यातील हिमायतनगर येथे मोठ्या प्रमाणात गुटखा जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी बचाटे यांना मिळाली. या आधारावर पीएसआय मनोज मानकर, पांडुरंग शिंदे यांच्यासह राजेश घोगरे, मोहन चाटे, संतोष आढावा हे हरदडा फाटा येथे वेषांतर करून सापळा रचून होते. त्यानुसार आज, २० ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता बोलेरो पीकअप वाहन क्रमांक एमएम २९ ६२७९ ब्राम्हणगावकडे जात होते. त्या वाहनाचा पाठलाग करून पोलिसांनी पकडले. त्यात २० बोरे वचन व्ही -२ नावाचा गुटखा आढळून आला. त्याची अंदाजे किंमत लाख रुपये वाहन असा १२ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी केला. या कारवाईत वाहन चालक मिर्झा अलीम बेग सरदार बेग रा. भुरेखा नगर, दारव्हा मो. शोएब मो. शब्बीर रा. बारभाई मोहल्ला, दारव्हा या दोघांना ताब्यात घेतले. सदर घटनेत वापरलेले वाहन कारंजा येथील अ. साकीर अ. नजीर यांच्या मालकीचे आहे. सोमवारी रात्री याच पथकाने हिमायतनगरवरून शेंबाळपिंपरी पुसद येथे दोन मोटार सायकलने ३० हजार रुपयांचा विमल गुटखा नेत असताना हरदडा फाटा दरम्यान पकडले. यामध्ये मोटारसायकलसह गुटखा जप्त केला असून, यामध्ये लिंबाजी भगवान मनवर रा. वागदरा ता. पुसद शे. सलीम शे. ईस्त्राईल रा. शेंबाळपिंपरी या दोघांना ताब्यात घेतले.