आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१२ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, अमरावती जिल्ह्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे- तालुक्याती लबोरगाव निस्ताने येथील समिर रवींद्र भलावी नामक १२ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतक समिर हा इयत्ता सहावीचा विद्यार्थी होता. घटनेच्या दिवशी तो शाळेत जाता घरीच होता.
दुपारच्या सुमारास घराच्या छताच्या लोखंडी अँगलला दुपट्ट्याने गळफास लावून त्याने आत्महत्या केली. घटनेच्या वेळी त्याची आई शेतात गेली होती, तर मोठा भाऊ भूषण हा धामणगाव रेल्वे येथे शाळेत गेला होता. सायंकाळी तो शाळेतून परत आल्यानंतर त्याला घराचे दरवाजे खिडक्या बंद आढळून आल्या. भूषणने त्याचे काका संजय भलावी यांना सांगितले.
त्यांनी घराच्या मागची खिडकी उघडून आत डोकावून पाहिले असता, त्यांना समिर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याच्या वडिलांचे सात वर्षांपूर्वीच आजाराने निधन झाले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
बातम्या आणखी आहेत...