आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: कारमधून तब्बल १४ लाखांची रोकड जप्त, दोन दिवसांत रोख पकडण्याची ही तिसरी कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अकोल्याकडून बडनेरात येणाऱ्या मुख्य मार्गावरील वेलकम पॉईन्टवर निवडणूक विभागाचे भरारी पथकाने शनिवारी (दि. १८) रात्री वाजताच्या सुमारास कारंजावरून आलेल्या कारमधून तब्बल १४ लाखांची रोकड जप्त केली आहे. दोन दिवसांत रोख पकडण्याची ही तिसरी कारवाई आहे. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या भरारी पथकाचे प्रमुख संतोष किल्लेकर, नायब तहसीलदार धीरज मांजरे तसेच ग्रामसेवक देशमुख पोलिसांच्या पथकाने पकडलेल्या कारच्या (क्रमांक एम. एच. ३७ जी ७६०२)डिक्कीमध्ये एक बॅग होती. याच बॅगमध्ये १४ लाखांची रोख मिळून आली. यावेळी कारमध्ये रमेश रामदयाल मुंधडा (५५, रा. कारंजा लाड) हे बसलेले होते. ही रक्कम नेमकी कश्यासाठी शहरात आणली जात होती, याबाबत अद्याप माहिती आली नसल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान पोलिसांनी ही रोख जप्त करून बडनेरा पोलिसांकडे जमा केली आहे. या संदर्भात मुंधडा यांनी पोलिसांना सांगितले की, सदर रक्कम दोन दिवसात बँकेतून काढली असून व्यवसायात गुंतवण्यासाठी शहरात राहणाऱ्या नातेवाईकाकडे घेऊन येत असल्याचे सांगितले आहे. गुरूवारी याच पथकाने साडेतीन लाख जप्त केले होते. 
बातम्या आणखी आहेत...