आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराजधानीत तीन तासातच 141.9 मि.मी, विदर्भात अनेक जिल्ह्यांत जोमदार ते मध्यम पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- दुष्काळाच्या छायेत असलेल्या विदर्भाला शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत असून , उपराजधानी नागपुरात तीन तासातच तब्बल १४१.९ मि.मी पाऊस झाल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. मात्र, विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस नसून हवामान खात्याने रविवारपर्यंत अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
 
ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील विदर्भात पाऊस नसल्याने सरासरी ३३ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. विदर्भावर यंदा दुष्काळाची छाया पसरणार की काय, अशी चिन्हे दिसत असताना शुक्रवारपासून सुरु झालेल्या पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी सायंकाळपासून उपराजधानी नागपुरात सुरु झालेल्या पावसाने मोठा दिलासा दिला. तीन तासातच १४१.९ मि.मी. पाऊस कोसळल्याने शहरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. मात्र, रात्री पावसाने विश्रांती घेतली. शनिवारी दिवसभर आकाशात ढग सूर्याचा लपंडाव सुरु राहिला. सायंकाळनंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले होते. 

शनिवारी सकाळी साडेआठपर्यंत विदर्भात नागपूर वगळता काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. प्रामुख्याने वर्धा जिल्ह्यात ४३.२ मि.मी., अमरावती ३८.६ मि.मी., गोंदिया ३७.४ मि.मी. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या पट्ट्यात ६९.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. मात्र, इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण किरकोळ राहिले. अकोला १७.६ मि.मी., बुलडाणा मि. मी., वाशीम मि.मी., यवतमाळ जिल्ह्यात १९ मि.मी. एवढाच किरकोळ पाऊस झाला. 

मराठवाड्यात रिमझिम 
मराठवाड्यात शनिवारी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. ती झाली नसली तरी अनेक जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली. बीड वगळता इतर जिल्ह्यांत मिमी पेक्षाही कमी पावसाची नोंद झाली. औरंगाबाद, हिंगोली, जालना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. 
बातम्या आणखी आहेत...