आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटात १५ वर्षे सेवा देऊन चूक केली काय? उपोषणकर्त्या शिक्षकांचा जि.प.ला खोचक सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - न्यायालयाने बदल्यांवरील स्थगिती खारीज केल्यानंतरही जिल्हा परिषदेने अद्याप मेळघाटातील शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू केली नसल्यामुळे नाराज शिक्षकांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही त्यांची दखल घेतल्यामुळे आम्ही मेळघाटातील शिक्षक जि.प.चे कर्मचारी नाही काय? मेळघाटात १५ वर्षे सेवा देऊन आम्ही चूक केली की काय ? असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनाला विचारला आहे.

आदिवासी भाग मेळघाटात सातत्याने १४ ते १५ वर्षे सेवा देऊनही जिल्हा परिषदेने मागील चार वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या केल्या नाहीत. यंदा मात्र बदली प्रक्रिया पार पडली. मेळघाटातील ३०० च्या वर शिक्षकांच्या बदल्या सपाटीवर झाल्या. तर सपाटीवरील शिक्षकांच्या बदल्या मेळघाटात झाल्या. परंतु, सपाटीवरील शिक्षकांना मेळघाटात जायचे नस्यामुळे ते न्यायालयात गेले. येथेच माशी शिंकली. बदल्यांना स्थगिती मिळाली. यानंतर मेळघाट शिक्षक कृती समितीने सर्व आव्हानांचा यशस्वीपणे सामना करीत न्यायालयात विजय मिळवला. आता बदल्यांवरील स्थगितीही खारीज झाली. न्यायालयाच्या अधीन राहून बदल्या झाल्याचे आदेशही जिल्हा परिषदेत पोहोचले आहेत. असे असताना जि.प. मेळघाटातील शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश का काढत नाही. गत तीन दिवसांपासून मेळघाट शिक्षक कृती समितीचे सदस्य असलेल्या १० शिक्षकांचे उपोषण सुरू आहे. मात्र झेडपीच्या एकाही अधिकाऱ्याने त्यांच्या मंडपाला भेट देण्याची माणूसकी दाखवली नाही. त्यामुळे जि.प.प्रशासनाविरुद्ध असंताेष आहे. सूरज वाघमारे, प्रियदर्शनी मेंढे, विकास भडांगे, इम्रान खान रऊफ खान, प्रवीण ढोके, संगीता उंबरकर, लिला साळुंखे, वंदना धवने, भूषण बागड यांच्या उपोषणाला मेळघाटातील ३०० च्या वर शिक्षकांनी पाठिंबा दिला आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांची भेट
उपोषणाच्याितसऱ्या दिवशी माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. श्रीराम पानझडे यांनी मेळघाटातील शिक्षकांच्या उपोषण मंडपाला भेट दिली. शिक्षक समिती सदस्यांशी चर्चा करताना त्यांनी कोणीही न्यायालयात जाऊ नये म्हणून मेळघाट सपाटीवरील शिक्षकांच्या बदलीचे आदेश देण्याची परवानगी शासनाकडे मागितल्याची तोंडी माहिती दिल्याचे उपोषणकर्ते सूरज वाघमारे यांनी सांगितले.

वेळमारून नेतेय जि.प.
जि.प.शिक्षणसभापती गिरीष कराळे यांनी मागे येथेच उपोषणाला बसले त्यावेळी तत्काळ तुमच्या बदल्या करतो, असे आश्वासन िदले होते. परंतु, सभापतींना आश्वासनाचा विसर पडला आहे. मेळघाटात १५ वर्षे सेवा देऊन आम्ही चुक केली की काय अशी भावना शिक्षकांमध्ये वाढत आहे.
बातम्या आणखी आहेत...