आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सहा महिन्यांत 172 अवयव प्रत्यारोपण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- एकेकाळी मृत्यूनंतर चेहरा विद्रूप होतो म्हणून नेत्रदानालाही नकार देणाऱ्या राज्यात आता अवयव दानाबद्दलही जागृती वाढली आहे. ब्रेन डेड झालेल्या मृताचे अवयव वेळेत दान केल्यास त्याचे तत्काळ प्रत्यारोपण करण्यात येते. राज्यात जानेवारी ते जून या सहा महिन्यांत सुमारे १७२ अवयव प्रत्यारोपण झाल्याची माहिती रिजनल आॅर्गन अॅँड टिश्यूज ट्रान्सप्लांट आॅर्गनायझेशन, मुंबईने दिली. येत्या १३ अाॅगस्ट रोजी “जागतिक अवयव प्रत्यारोपण’ दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
राज्यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे विभागीय प्रत्यारोपण समित्या स्थापन केल्या आहेत. मुंबई समितीशी ३४, पुणे समितीशी ३२, औरंगाबाद ५ व नागपूर समितीशी ५ रुग्णालये जोडण्यात आली आहेत. या रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची यादी तयार आहे. विभागीय प्रत्यारोपण समिती समन्वयाचे काम करते, अशी माहिती नागपूर येथील समितीचे सचिव डाॅ. रवी वानखेडे यांनी दिली. ब्रेन डेड झालेल्या रुग्णाची माहिती तत्काळ समितीला दिली जाते. त्यानंतर समितीचे पदाधिकारी संबंधित मृत व्यक्तीच्या आप्तेष्टांची भेट घेऊन समुपदेशन करतात. त्यानंतर अवयव तत्काळ गरज असलेल्या ठिकाणी पाठवण्यात येतात. नागपूर येथे सध्या मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जाते. त्यामुळे इतर अवयव इतरत्र पाठवले जातात. आतापर्यंत नागपूर येथून ४ लिव्हर मुंबईला पाठवण्यात आल्याचे डाॅ. वानखेडे यांनी सांगितले. राज्यात सहा महिन्यांत किडनी - ९४, लिव्हर - ५३, हार्ट - २३, पॅन्क्रियाज १ व लंघ १ प्रत्यारोपण झाले.   

सहा किडनी प्रत्यारोपण  
राज्यामध्ये मुंबई विभागीय प्रत्यारोपण समितीमार्फत किडनी : ३४, लिव्हर : २२, हार्ट : १६ व लंघचे १ प्रत्यारोपण झाले. पुणे विभागीय प्रत्यारोपण समितीमार्फत किडनी : ४२, लिव्हर : २८, हार्ट : ६ व पॅन्क्रियाजचे १ प्रत्यारोपण. औरंगाबाद विभागीय प्रत्यारोपण समितीमार्फत किडनी : ६ व हार्टचे १ आणि नागपूर विभागीय प्रत्यारोपण समितीमार्फत किडनी : १२ व लिव्हरचे ३ प्रत्यारोपण झाले. 
बातम्या आणखी आहेत...