आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागातील धरणांमध्ये १८% पाणी, महिनाभरात मोठी घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विदर्भात वऱ्हाडातील सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याला सुरुवात होऊन अवघा महिनाही उलटला नाही. पावसाळ्याला प्रत्यक्ष सुरुवात व्हायला पावणे दोन महिन्यांचा कालावधी अद्याप बाकी आहे, अशा परिस्थितीत अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्यांतील झपाट्याने कमी होणाऱ्या जलसाठ्याने आगामी काळात उद‌्भवणाऱ्या जलसंकटाची सूचना दिली आहे. जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार अकोला, वाशीम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील २५० लघुप्रकल्पांमध्ये टक्क्यांच्या खाली पाणी शिल्लक आहे, तर या भागातील सहा मोठे आणि नऊ मध्यम सिंचन प्रकल्पांतील जलसाठा १० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. १० टक्क्यांच्या खाली आलेले हे सिंचन प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. जलसंपदा विभागाच्या नोंदीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात ६.५३ टक्के, अरुणावती प्रकल्पामध्ये ८.८२ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात १०.०७ टक्के, आणि बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगामध्ये ९.५८ टक्के, पेनटाकळीत ४.२४ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. ऐनउन्हाळ्याच्या मध्यातच पाण्याची भीषण टंचाई हे चित्र आहे. मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पात २७.८५ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील बेबंळामध्ये ३१.८९ टक्के, अकोल्यातील वान प्रकल्पात ४४.४९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विभागात असलेल्या २३ मध्यम सिंचन प्रकल्पांतील पाण्याची पातळीसुद्धा कमी होण्यास सुरुवात झाली आहे. या २३ प्रकल्पांची क्षमता ६५९.४७ दलघमीएवढी आहे. मात्र, आजमितीस या प्रकल्पांमध्ये १५३.१६ दलघमी (२३.२२ टक्के) एवढे पाणी शिल्लक आहे, तर प्रकल्पांमधील जलसाठा १० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे.
४६० प्रकल्पांत १८ टक्के जलसाठा ( पाणी दलघमीमध्ये)
सिंचन प्रकल्प -एकूण संख्या -साठवण क्षमता -उपलब्ध जलसाठा -टक्केवारी
मोठे -९ -१३९९.९१ -२९१.७ -२०.८४
मध्यम -२३ -६५९.४७ -१५३.१५ -२३.२२
लघू -४२८ -९४२.४२ -१०९.१८ -११.५९
एकूण -४६० -३००१.८० -५५४.०३ -१८.४६

एक महिन्यात तब्बल १८१ दलघमी पाणीे कमी
विभागातील मोठे, मध्यम आणि लघू अशा ४६० सिंचन प्रकल्पांमध्ये मागील एका महिन्यात १८१ दशलक्षघनमीटरने पाणीसाठा कमी झाला आहे. कमी झालेल्या पाणीसाठ्याचे हे प्रमाण ६% आहे.
बातम्या आणखी आहेत...