आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू घाटावरून 19 ट्रक, तीन जेसीबी केल्या जप्त; ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीची आष्टा घाटावर धाड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाष्टा घाटावरून पोलिसांनी जप्त केलेले वाळू उत्खननाचे साहित्य. - Divya Marathi
अाष्टा घाटावरून पोलिसांनी जप्त केलेले वाळू उत्खननाचे साहित्य.
अमरावती: धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा गावालगत असलेल्या वर्धा नदीवरील आष्टा वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात वाळुचे उत्खनन सुरू होते. यावेळी उत्खननासाठी मोठ्या प्रमाणात नियमबाह्य साहित्य यंत्र सामग्रीचा वापर करण्यात येत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीने गुरूवारी (दि. १५) सायंकाळी आष्टा घाटावर कारवाई करून जवळपास तीन कोटी रुपयांचे नियमबाह्य साहित्य जप्त केले आहे. वाळूघाटावर पेालिसांकडून झालेली ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई आहे.
 
आष्टा येथे वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू होते. याठिकाणी महसूल विभागाने उत्खनन करण्यासाठी ठरवून दिलेल्या साहित्यांचा वापर करणे बंधनकारक होते. मात्र संबधिताने याठिकाणी नौका, नौकेत यंत्राव्दारे वाळू उपसा, तसेच जेसीबीद्वारेे उपसा त्यानंतर वाहतुकीसाठी ट्रक असे साहित्य वापले जात होते. ही माहिती मिळताच एलसीबीचे एपीआय नीलेश सुरडकर आणि एपीआय नीलेश ठाकरे यांनी पथकासह त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी वाळू घाटावरून तब्बल १९ ट्रक, तीन जेसीबी आणि चार नौका यासह विवीध प्रकारची यंत्रसामग्री असा जवळपास तीन कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 

या प्रकरणात पोलिसांनी तुर्तास एकोणवीस ट्रकचालकाविरुध्द कारवाई केली असून आरोपींची संख्या वाढणार असल्याचे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 
 
ही कारवाई एलसीबीचे एपीआय किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुरडकर, ठाकरे, एएसआय अरुण मेटे, मलादपुरे, बाबा ठाकरे, दिनेश कनोजिया आणि दुबे यांनी केली आहे. या प्रकरणात दोषीविरुध्द पर्यावरण सरक्षण अधिनियमाव्दारे कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी महसूल प्रशासनाला दिली आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...