आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती विभागातील १९० धरणे भरली यंदा हाऊसफुल्ल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे विभागातील १९० धरणांमधील जलसाठा ‘हाऊसफुल्ल’ झाला आहे. या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पुस या दोन मोठ्या प्रकल्पासह, १२ मध्यम सिंचन प्रकल्प आणि १७० लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. तर चार मोठे, आठ मध्यम प्रकल्प नव्वद टक्क्यांच्या वर भरले आहेत. जलसाठ्याची पातळी शंभर टक्के भरलेल्या सर्व धरणांचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात येत आहे. विभागातील अनेक सिंचन प्रकल्पांमध्ये ८० टक्क्यांच्या वर जलसाठा आहे. पावसाला दमदार सुरूवात होण्यापूर्वी विभागातील मोठ्या धरणांमध्ये १० टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र, आता पाऊस ओसरण्याच्या मार्गावर असताना सोमवारी(दि.२६ सप्टेंबर)हा जलसाठा ८१ टक्के एवढा झाला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे विभागातील मोठ्या धरणांमधील जलसाठ्यात दुप्पट वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा , यवतमाळ जिल्ह्यातील पुस, सायखेडा, गोकी, वाघाडी, नवरगाव आणि बोरगाव हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अरूणावती सिंचन प्रकल्पात ९० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वान सिंचन प्रकल्पात ९० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी, आणि खडकपूर्णा या धरणांमध्ये सरासरी २५ ते ८० टक्के एवढाच जलसाठा आहे. हा जलसाठा नुकत्याच झालेल्या पावसामुळे संपूर्ण विदर्भात जवसाठा वाढला आहे.
दोन दिवसात होणाऱ्या पावसामुळे जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षाच्या तुलनेत या वर्षी मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्याने निचांक गाठला होता. विभागातील मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये(४८० प्रकल्प) सद्यस्थितीत ८१ टक्के एवढा जलसाठा आहे. यात लघू, मध्यम आणि मोठे या तीनही प्रकल्पांमधील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.
मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा(द.ल.घ.मि.) असा : प्रकल्प-जिल्हा -संकल्पीत साठा -आजचा साठा(द.ल.घ.मि.) उर्ध्ववर्धा (अमरावती) -५६४.०५ -५६४.०५,पुुस (यवतमाळ)-९१.२६ -९१.२६, अरूणावती (यवतमाळ )-१६९.६७ -१५८.१७ , बेंबळा (यवतमाळ) -३०२.६७ -१७१.७६ , काटेपूर्णा (अकोला) -८६.३५ -८१.०१, वान -अकोला -८१.९५ -७८.३५ , नळगंगा (बुलडाणा) -६९.३२ -१८.१४, पेनटाकळी (बुलडाणा) -५९.९७ -२०.३१, खडकपूर्णा (बुलडाणा) -९३.४० -७६.२०.
बातम्या आणखी आहेत...