आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीवर फेकलेले अॅसिड की तेल, संभ्रम कायम; 2 आरोपींना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पोलिसांच्या तपासात विद्यार्थीनीच्या चेहऱ्यावर फेकलेला द्रव गोडेतेल असल्याचे म्हटले जात असून , जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मते हा द्रव तेल नसून अॅसिड असल्याचे म्हटल्यानेे फेकलेला द्रव पदार्थ गोडेतेल की अॅसिड असा संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, या प्रकरणी विद्यार्थीनीवर पदार्थ फेकणाऱ्या सुशील विलास मेश्राम (वय १९) रा. बोदुरखेडा ता. भातकुली दुचाकी चालक भूषण हरिश्चंद्र उके (वय १९) रा. सुकळी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला असून डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विद्यार्थीनीवर झालेल्या या हल्ल्यामुळे ‘मला काय करायचे’ या समाजातील वाढत्या प्रवृत्तीबद्दलही प्रश्न निर्माण झाला आहे.

 

नवव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीच्या चेहऱ्यावर मंगळवारी डिसेंबरला सायंकाळी द्रव पदार्थ फेकल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी रात्रीच पाच जणांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणी सुशील मेश्राम भूषण उके या दोघांवर गुन्हा नोंदवला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशील मामीच्या घरी राहणाऱ्या विद्यार्थीनीचे प्रेमप्रकरण होते. या प्रकरणाची कुणकुण मामीला लागताच त्यांनी सुशीलला समजही दिली होती. त्यामुळे दरम्यानच्या काही काळात या प्रकरणाला विराम मिळाला होता. परंतु पीडित विद्यार्थीनीचे दुसऱ्या मुलाशी सुत जुळल्याची माहिती सुशीलला मिळाली होती. त्यामुळे सुशीलने सुडाच्या भावनेतून विद्यार्थीनीचा काटा काढण्याचे ठरवले होते. त्यामुळे मंगळवारी सुशीलने गोडेतेल विकत घेतले. सुशीलच्या गावातील परंतु शहरात राहणाऱ्या महिलेकडे गाडीचे शॉकअप खराब झाल्याचे सांगून त्यात टाकण्यासाठी गरम तेल पाहिजे असल्याचे कारण सुशीलने महिलेला सांगितले. त्यामुळे त्या महिलेने सुशीलला तेल गरम करून दिले. गरम तेल नेण्यासाठी सुशीलने नवीन थर्मासही खरेदी केला होता. त्यानंतर सुशील भूषण यांनी गरम तेल भरून मित्राची दुचाकी घेतली. दोघांनीही हेल्मेट घालून सायंकाळी विद्यार्थीनीच्या चेहऱ्यावर तेल फेकले. घटना स्थळावरील पुरावे केलेल्या चौकशीच्या आधारे विद्यार्थीनीच्या चेहऱ्यावर फेकलेले गोडे तेलच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम हा पदार्थ अॅसिड असल्याचे म्हटल्यामुळे संभ्रम निर्माण झाला. दोन्ही आरोपींविरुद्ध फ्रेरजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली. दोघांनाही डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

तेअॅसिड नसून गरम तेल असल्याची आरोपींची कबुली : पोलिस उपायुक्त
शहरात १४ वर्षीय विद्यार्थिनी शाळा संपल्यानंतर घरी परतताना तिच्यावर दोन किशोरवयीन आरोपींनी अॅसिड फेकल्याच्या घटनेने शहरात डिसेंबरला खळबळ उडाली. या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता त्या दोघांनी त्या मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड नव्हे गरम तेल फेकल्याचा कबुलीजबाब दिल्याची माहिती पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याचेही त्यांनी सांगितले. तेलामुळे विद्यार्थिनीच्या चेहऱ्याचा काही भाग, खांदा जळाला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी शोध घेत सुशील मेश्राम भुषण उईके (दोघेही १९ वर्षे) या दोन आरोपींना अटक केली. या दोन्ही आरोपींनी अॅसिड नव्हे तर गोडे तेल फेकल्याचे कबुल केले. या दोघांनी श्यामनगरातील नातेवाईक महिलेला आमच्या मोटारसायकलचे बेअरिंग शाॅकअप जाम झाले असून त्यांना फ्री करण्यासाठी गरम तेलाची आवश्यकता आहे, असे सांगून तेल गरम करून घेतले. त्यानंतर ते थर्मासमध्ये भरले. ही विद्यार्थिनी शाळेतून घरी कोणत्या मार्गाने परत जाते याची सुशील भूषणला माहिती होती. हाती गरम तेलाचा थर्मास घेऊन हे दोघेही तिची त्या मार्गावर वाट बघत होत. त्यानंतर ही विद्यार्थिनी जवळ येताच तिच्या चेहऱ्यावर गरम तेल फेकून दोघेही पसार झाले. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन दोन्ही १९ वर्षीय आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून कढई, थर्मास, मोटारसायकल, हेलमेट जप्त केल्याची माहितीही एसीपी पंडित यांनी दिली.

 

प्रोत्साहन टाळणे आवश्यक
प्रेम, मैत्री, आकर्षण यातील सीमारेषा स्पष्ट होणे आवश्यक आहे. मित्र, मैत्रिणी शिक्षक, पालकांकडून केलेले प्रेम स्पष्ट कळणे आवश्यक आहे. यात कुठे मैत्री संपत, कुठे आकर्षण सुरू होते याची जाणीव होणे आवश्यक आहे. या सीमारेषा स्पष्ट नसल्या तेव्हा भावनिक उद्रेक होणार हे स्पष्ट आहे. घटना घडल्यानंतर त्यावर प्रतिक्रीया व्यक्त केल्या जातात. परंतु नजरेसमोर जे काही दिसून येते त्यावर मात्र प्रतिक्रिया समाजातून उमटत नाही. . समाजाची बोटचेपी भूमिका असल्याने असे प्रकार घडतात. े. नकार स्वीकारणे कधी शिकवले जात नसल्यानेे ही भावना वाढीस लागते. त्यामुळे फाजील आत्मविश्वास मुलांना देऊ नका. परिस्थिती पाहून ‘मला काय करायचे’, ‘जाऊ द्या ना आपले काय जाते’ असे म्हणणे म्हणजे नकळतपणे दिला जाणारे फाजील प्रोत्साहन आहेच. त्यामुळे अशा घटना म्हणजे या फाजील प्रोत्साहनाचे परिणाम आहेत. त्यामुळे तेही स्वीकारणे अपरिहार्यच आहे.
-पंकज वसाडकर, मानसोपचार तज्ज्ञ

 

अॅसिड असल्याची नोंद
जखमी मुलीवर वैद्यकिय तज्ज्ञांनी उपचार केले आहे. मुलीच्या शरीरावर अॅसीड असल्याची नोंद सुध्दा ‘केस पेपर’ करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या नोंदी ते अॅसीडच आहे. उकळते तेल असल्याची चर्चा सुरू असल्यामुळे आम्ही बुधवारी पुन्हा केस पेपर तपासले असता त्यावर अॅसीड अशीच नोंद आहे.
- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकीत्सक.

 

चाचणी अंती अहवाल देवू
पोलिसांनी माहिती दिल्यानेे आम्ही नमुने गोळा करून पोलिसांकडे दिले आहे. हे नमुने पोलिसांची प्रक्रीया पुर्ण करून आमच्याकडे देण्यात येईल. त्यानंतर आम्ही चाचणी करून ते द्रव्य कोणते याबाबत अहवाल देणार आहोत. मात्र अहवाल देण्यापुर्वी चाचण्या करण्यासाठी अवधी लागतो.
- डॉ. विजय ठाकरे, उपसंचालक, प्रादेशिक न्याय वैद्यक प्रयोगशाळा, अमरावती.

 

‘सीपीं’नी रात्रभर ठोकला पोलिस ठाण्यामध्ये तळ
विद्यार्थीनीवर झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनावरील ताण कमालीचा वाढला होता. त्यामुळे पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलीक यांनी मंगळवारी (दि. ५) रात्रभर फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात ठाण मांडले होते. पहाटे पाच वाजता प्रकरणाचा निपटारा झाल्यानंतरच मंडलीक यांनी फ्रेजरपुरा पोलिस ठाणे सोडले.

बातम्या आणखी आहेत...