आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परप्रांतीय मजुरांचे 2 वाहन उलटले; ठार, ३२ जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगडमधून महाराष्ट्रात येणाऱ्या मजुरांचे मालवाहू वाहन एका टेकडीजवळ अचानकपणे उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा मृत्यू, तर ३० ते ३२ जण जखमी झाले. हा अपघात मोर्शी ते उतखेड मार्गावर शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडला. सर्व जखमींवर येथील इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नियमानुसार मालवाहू वाहनातून माणसांची वाहतूक करता येत नाही.तरीही क्षमतेपेक्षा अधिक दाटीवाटीने मजुरांना बसवून वाहतूक केली जात होती. यापूर्वीही अशा अपघाताच्या अनेक घटना घडल्या तरीही मालवाहू वाहनांतून माणसांची वाहतूक अजूनही थांबलेली नाही.
मोर्शी तालुक्यात असलेल्या उतखेड येथील एका कंत्राटदाराच्या सांगण्यावरून मालवाहू बोलेरो पिकअप वाहनातून एकाचवेळी तब्बल ३२ ते ३४ मजुरांना छत्तीसगडवरून मोर्शीजवळ असलेल्या उतखेड या गावात आणले जात होते. मोर्शीपासून काही अंतर सोडल्यानंतर उतखेडच्या अलीकडे असलेल्या माथाडी टेकडीजवळ बोलेरो चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. यावेळी मजुरांनी खचाखच भरलेल्या बोलेरो वाहनाचे चाकं वर आणि मजूर खाली दबले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच मोर्शी पोलिस परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन वाहनातील जखमींना तातडीने मोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र यापैकी अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मोर्शीवरून त्यांना अमरावतीत आणण्यात आले. अमरावतीत आल्यानंतर जखमींपैकी राजकुमार भुवन दहाडिया (३५, रा. टिळा, छत्तीसगड) आणि रवी सुदामराव नवरंगे २८ (रा. टिळा) या दोघांना डॉक्टरांनी मृत घाेषित केले. तर उर्वरित जखमींवर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान,या अपघाताचा तपास मोर्शी पोलिस करत आहे.

अपघातातील जखमींची नावे
१)धनेश्वरी कारणदास वंजारी (३५, गिलोगाेड), २)रोशनी कारणदास वंजारी (९), ३)लती कारणदास वंजारी (३), ४)सानोदा सेवेन तहलवारी (३०, रा. ईश), ५)रोमा सेवन तहलवारी (दीड वर्ष, रा. ईश), ६)देवंतीनबाई राजकुमार दहाडिया (४०, रा. टिळा), ७)सेवेंद्र राजकुमार गहीलवारे (४५, रा. ठाणाबालाजी), ८)कृष्णा राजकुमार दहाडिया (२२, रा. बालोदा), ९) दीपक राजकुमार दहाडिया (१५, रा. बालोदा), १०) इरिवृंदी जीवन नवरंगे (५५), ११) कारणदास वंजारी, बेला सहदेव कोसले (४०), १२) पारस सहदेव कोसले, १३) संजय सहदेव कोसले, १४) चिंताराम अवनलाल नवरंगे (३०), १५) चितरेखा चिंताराम नवरंगे (२५ रा. टिळा), १६) प्रेमकुमार अवनलाल नवरंगे (१६), १७) दिलीपकुमार मंतराम गैरवारे (३४, टिळा), १८) चंद्रशेखर कुमनदास केंटे (२५, टिळा), १९) कुजराम बाबुदास कोसले (३०, रा. टिळा), २०) देवाराज पुकुराम सोनवाती (२७, रा.आलेसूर), २१) गजेंद्र मंगलचंद्र चेलख (२५, रा. टिळा), २२) शुभ्रदा जग्गनाथ सोनवानी, २३) जगनाथ मोहनलाल सोमवानी (रा. राजाठाण), २४) शिला हिरासिंग नवरंगे (१९, रा. राजाठाण), २५) सुहाना हिरासिंग नवरंगे (७), २६) पूजा हिरासिंग नवरंगे (दीड वर्ष), हिरासिंग बेनी नवरंगे यांच्यासह वाहनचालक विलास वानखडे (रा. ऊतखेड) यांच्यासह अन्य तिघे असे जखमींची नावे आहेत.

या अपघातात छत्तीसगडवरून कामासाठी येणाऱ्या मजुरांचे कुटूंबीय होते. या ३२ जखमींमध्ये सहा महिन्याच्या चिमुकल्यांपासून ते वर्षांपर्यंतच्या पाच बालकांचाही समावेश होता. अपघातात या चिमुकल्या जिवानांही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातामुळे होणाऱ्या वेदनांनी ते चिमुकले विव्हळत होते. यावेळी चिमुकल्यांच्या असह्य वेदना रडण्याच्या किंकाळ्यांनी अवघे इर्विन रुग्णालय गहिवरले होते. हे सर्व जखमी परप्रांतातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत अाहेत. एकमेकांच्या आधाराने ते पोट भरण्यासाठी येत असताना हा अपघात घडला. त्यामुळे या अपघातातील जखमींना पाणी द्यायलाही जवळचे नातेवाईकही नव्हते. मात्र इर्विनमधील आरोग्य यंत्रणा, पोलिस, पत्रकार, समाजसेवकांनी जखमींना आवश्यक ती मदत करून माणूसकीचा परिचय दिला.
बातम्या आणखी आहेत...