गोंदिया - आमगांव तालुक्यातील पदमपूर येथे शेतात वीज कोसळून 2 शेतकऱ्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. दोन्ही शेतकऱ्यांचे वय 30 ते 35 वर्षे आहे. पाऊस सुरू असतानाच बाहेरील जनावरे आवरण्यासाठी शेतकरी शेतात गेले होते. त्याचवेळी हा प्रकार घडला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आमगांव व सालेकसा तालुक्यात सोमवारी वीजांसह जोरदार पाऊस पडला. याचवेळी आपल्या शेतात चरणाऱ्या जनावरांना आवरण्यासाठी रमेश महारवाड (30) आणि मुन्ना भांडारकर (35) बाहेर पडले. त्याचवेळी जोरदार वीज कोसळली. यात रमेश आणि मुन्ना या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात पाऊस आणि वीजांच्या कडकडाटामुळे स्थानिक प्रशासनाने नदीकाठापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.