आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढरकवडा तालुक्यामध्ये विष पिऊन 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - पांढरकवडा तालुक्यातील करंजी, तसेच सिंगलदिप गावातील दोन तरूण शेतकऱ्यांनी आज, दि. सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मोहन रसाल चव्हाण, वय ४२ वर्ष, रा. करंजी, तर राजू रामचंद्र टेकाम, वय ३२ वर्ष, रा. सिंगलदिप, असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. 
 
शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बँकांकडून काढलेल्या पैशाची परतफेड कशा पद्धतीने करावी, या विवंचनेत शेतकरी अडकला आहे. सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आज, सप्टेंबर रोजी पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथील मोहन चव्हाण यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या नावे करंजी परिसरात चार एकर शेती आहे. 

तर बँकेचे तसेच खासगी सावकाराचे कर्ज त्यांच्या नावे होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली. कर्जाची परतफेड करण्याच्या विवंचनेमध्ये मोहन याने विष प्राशन करून जीवन संपविले. तर दुसरी घटना पांढरकवडा तालुक्यातील सिंगलदीप गावात घडली. तेथील राजू टेकाम या तरूण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या वडलांच्या नावाने शेती होती, परंतु ही शेती स्वत: राजू वहित होता. 
बातम्या आणखी आहेत...