आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भातकुली तालुक्यातील सावरखेड येथे राहणारे दोन युवक गुरूवारी अमरावतीवरून गावाकडे परत जात असताना चांगापूर फाट्याजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक युवकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. तसेच दुसरा अपघात नांदगाव पेठ टोलनाक्याजवळ ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्याने झाला. यामध्येसुद्धा एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला आहे. हे दोन्ही अपघात गुरूवारी (दि. २७) सांयकाळी झाले. दिनेश सुरेशराव खोरगडे (२४, रा. सावरखेड, ता. भातकुली) असे मृतक युवकाचे नाव आहे. याचवेळी दिनेशसोबत असलेला मित्र जीवन देविदास शेजव २१, उर्वरित.पान
हाजखमी झाला आहे. दिनेश जीवन हे दोघे शहरातील काम आटाेपून दुचाकीने (क्रमांक एम. एच. २७ डब्ल्यू २१३६) गावी जाण्यासाठी निघाले होते. गुरूवारी सायंकाळी वाजताच्या सुमारास चांगापूर फाट्यावर दिनेशच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने आलेल्या मालवाहू ऑटोने धडक दिली. या धडकेत दिनेश खोरगडे जीवन शेजव या दोघांनाही गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्यांना उपचारासाठी इर्विनमध्ये दाखल केले असता तपासणीअंती डॉक्टरांनी दिनेश खोरगडेला मृत घोषित केले. तर जखमी जीवनवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात जीवन शेजवच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसरा अपघात गुरूवारी रात्री वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ टोलनाक्यावर घडला आहे. या अपघातात ट्रॅक्टरचालक मोहन ऊर्फ गुड्डू फागोजी गाडरे (रा. मध्य प्रदेश ह. मु. सावरखेड, ता. मोर्शी) याचा मृत्यू झाला आहे. तर याचवेळी ट्रॅक्टरवर असलेला दीपक मेहतराम वटी (२२, मध्य प्रदेश, ह. मु. सावरखेड) हा जखमी झाला आहे. गाडरे हा ट्रॅक्टरचा मालक असून सोयाबीन काढणीचा हंगाम असल्यामुळे ट्रॅक्टर घेऊन तो मध्य प्रदेशातून आलेला होता. मागील काही दिवसांपासून मोर्शी तालुक्यातील सावरखेड येथे राहून तो आजूबाजूच्या गावात सोयाबीन काढण्याचा व्यवसाय करत होता. याचवेळी दिनेश वटी हा ट्रॅक्टवर मजूरी करत होता. गुरूवारी दुपारी गुड्डू दीपक हे ट्रॅक्टरचे काम करण्यासाठी अमरावतीला आले होते. काम आटोपून परत सावरखेडला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास जात असताना गुड्डूचे नियंत्रण सुटले ट्रॅक्टर थेट टाेलनाक्याजवळील दुभाजकावर जाऊन आदळला. जखमींना तातडीने रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी गुड्डू गाडरेला मृत घोषित केले. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास नांदगाव पेठचे जमादार गजानन बोरवाल करत आहे.
बातम्या आणखी आहेत...