आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिमटाळा स्थानकावरील दुर्दैवी घटना,सासू-सुनेला मालगाडीने चिरडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अंत्ययात्रेसाठी घरून निघालेल्या घाईगडबडीत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या सासू सुनेला अचानक मालगाडीने चिरडल्याने दोघींचाही घटनास्थळीच दुर्देवी अंत झाला. ही घटना सोमवारी (दि. १७) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास टिमटाळा रेल्वेस्थानकावर घडली.शोभाबाई रामदासजी दाऊतपुरे (६५) आणि चंदाबाई पंजाबराव दाऊतवारे (४२, दोघेही रा. गंगाजळी, धामणगाव रेल्वे) अशी रेल्वेने कटून मृत्यूमुखी पडलेल्या सासू सुनेचे नाव आहे. भावाच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या बहिणीसह सुनेचा रस्त्यातच अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अंजनगाव बारी येथे शोभाबाई दाऊतपुरे यांचे भाऊ नारायणराव राऊत राहत होते. रविवारी (दि. १६) नारायणराव राऊत यांचे निधन झाले. त्यामुळे भावाच्या मृत्यूची वार्ता बहीण शोभाबाई यांना कळताच भावाच्या अंत्यदर्शनासाठी शोभाबाई सोमवारी सकाळी सून चंदासोबत वर्धा -भुसावळ पॅसेंजरने धामणगाववरून अंजनगाव बारीला जाण्यासाठी निघाल्या.

सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास त्या टिमटाळा रेल्वे स्टेशनवर उतरल्या. टिमटाळा रेल्वेस्टेशन येथेून अंजनगाव बारीला जाण्यासाठी सोईचे होते. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे स्टेशनवरून पुढे गेल्यानंतर सासू आणि सून दोघी रेल्वेरुळ पार करून अंजनगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर येत होत्या.

दरम्यान रुळ ओलांडण्यापूर्वीच बडनेराकडून नागपूरच्या दिशेने जाणारी एक मालगाडी टिमटाळा रेल्वेस्टेशनजवळ पोहोचली. याच मालगाडीने सासू- सुनेला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सासू सुनेच्या शरीराचे अवयव छिन्न विछीन्न होऊन रेल्वे रुळापासून दहा ते पंधरा फूट दूर जाऊन पडले. काही वेळानंतर ही बाब नागरिकांच्या लक्षात आली. नागरिकांनी तत्काळ ही माहिती बडनेरा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचे िवखुरलेले अवयव एकत्र केले. माहिती मिळाल्यानंतर बडनेरा ठाण्याचे हवालदार इक्बाल खान पोलिस नाईक जे. बी. रुपनारायण घटनास्थळी पोहोचले. दुसरीकडे अंजनगाव बारी येथे राऊत यांच्या अंत्ययात्रेसाठी दाऊतवारे यांचे नातेवाईक आले होते. त्यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते नातेवाईकसुद्धा घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मृतदेहदोन तास घटनास्थळीच : पोलिसघटनास्थळी पोहोचले, त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह इर्विनमध्ये आणण्यासाठी वाहनाची आवश्यकता होती. मात्र रस्ता खराब असल्यामुळे पोलिसांचे वाहन घटनास्थळापर्यंत पोहोचू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा तयार केला वाहनाच्या प्रतिक्षेत मृतदेह त्याच ठिकाणी जवळपास दोन तास ठेवले. त्यानंतर दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास मृतकांच्या नातेवाईकांनीच कसे बसे एक वाहन आणले, या वाहनात दोन्ही मृतदेह टाकून सायंकाळी वाजताच्या सुमारास इर्विनमध्ये पोहोचले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान दोन्ही मृतदेहावर विच्छेदन करण्यात आले.
दाऊतपुरेपरिवारावर कोसळला दुखाचा डाेंगर : शोभाबाईदाऊतपुरे यांना पंजाब सुरेश असे दोन मुले आहेत. त्यापैकी पंजाब यांच्या पत्नी चंदाबाई यांचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाला. चंदाबाई यांना एक मुलगा एक मुलगी आहे. एकाचवेळी सासू सूनेचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे दाऊतपुरे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
भावाचे अंत्यदर्शन घेण्याची इच्छा अपूर्ण
नारायणराव राऊत यांचे रविवारी वृध्दापकाळाने निधन झाले होते. भावाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी ६५ वर्षीय शोभाबाई अंजनगाव बारीलाच येत होत्या. मात्र भावाचे अखेरचे दर्शन होण्यापुर्वीच मालगाडीच्या रुपात आलेल्या काळाने शोभाबाईंवर झडप घातली.
बातम्या आणखी आहेत...