आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ध्यात सेल्फी काढण्याचा नादात बोर धरणावर बुडून दोघा मित्रांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- वर्ध्यात सेल्फी काढण्याचा नादात बोर धरणावर बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. पंकज गायकवाड आणि निखिल काळबांडे अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. नागपूरच्या शिवनगाव खापरी भागात राहणारे 12 मित्र फिरण्यासाठी वर्ध्यातील बोर धरणावर गेले होते.
 
यावेळी पंकज गायकवाड हा पाण्यात पोहत होता, तर निखिल भिंतीवर उभा राहून फोटो काढत होता. फोटो काढताना पाय घसरुन तो बुडाला. मित्राला वाचवण्यासाठी पंकजही पोहत गेला.
मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात पंकजही बुडाला आणि दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...