आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदूर न. पा. सभापतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, 20 वर्षीय महिलेची तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - चांदूरबाजार नगर परिषद भाजपचे शिक्षण आरोग्य सभापती गोपाल तिरमारे (३२) विरुद्ध शहरात राहणाऱ्या एका २० वर्षीय महिलेने शारीरिक शोषणाचा आरोप करून पोलिसात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी सोमवार, डिसेंबरला पहाटे तिरमारेविरुद्ध आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

या प्रकरणातील तक्रारदार महिलेचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यातच तिच्या पतीचे मानसिक संतुलन बिघडल्याने पती तिला सोडून निघून गेला होता. दरम्यान, ही महिला एका नातेवाइकाच्या आधाराने शहरात आली. ती भाड्याने राहत होती तसेच उदरनिर्वाहासाठी एका प्रतिष्ठानमध्ये काम करत होती. विशेष म्हणजे या महिलेला नऊ महिन्यांची मुलगीसुद्धा आहे.


दीड वर्षांपूर्वी महिलेकडून चुकीने एका मोबाइल क्रमांकावर कॉल लागला होता. त्यावेळी या मोबाइल धारकाने या महिलेला कॉल करून तिच्यासोबत संभाषण केले. तो कॉल गोपाल तिरमारेचा असल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. या कॉलनंतर दोघे एकमकांशी सातत्याने बोलचाल करत होते. त्यामुळे यांच्यात मैत्री झाली. याच मैत्रीतून गोपालने तिला शहरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलवले होते. दरम्यान, एक महिन्यापूर्वीच गोपाल तिरमारेने कारमध्ये मार्डी मार्गावर या महिलेला फिरायला नेले. यावेळी कारमध्येच अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

 

त्यानंतर भाड्याच्या घरात येऊन घरात कुणीही नसल्याची संधी साधून घरातही अत्याचार केला. दरम्यान, वारंवार सुरू असलेल्या भेटी प्रेमसंबंध पाहता पीडितेने गोपालकडे लग्नाची गळ घातली. त्यावेळी गोपालने आपले लग्न झाले असल्याचे सांगून मुलही आहे, त्यामुळे आपण लग्न करू शकणार नाही, असे सांगितले. या प्रकाराने पीडितेला जबर धक्का बसला होता.
त्यानंतर मागील १५ दिवसांपासून गोपाल आपल्याशी योग्य बोलत नसल्यामुळे हा प्रकार पीडितीने घराच्या परिसरातच राहणाऱ्या नातेवाईक महिलेला सांगितला. त्यामुळे ३० नोव्हेंबरला पीडिता तिची नातेवाईक या दोघी चांदूर बाजारला गेल्या. नगर परिषद परिसरात जाऊन त्यांनी गोपालला फोन केला, त्यावेळी गोपाल भेटायला आला. मात्र या ठिकाणी काही बोलता मी उद्या अमरावतीला येतो, त्याच ठिकाणी बोलू, असे सांगितले. त्यामुळे त्या दोघी अमरावतीला परत आल्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गाेपाल आला. पीडिता गोपाल यांच्यात बोलणे झाले, गोपाल लग्न करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम होता.

 

तसेच मी लग्न करणार नाही, काही पैसे घेऊन विषय संपवून टाक असेही त्याने म्हटल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याप्रकरणी पीडितेने फ्रेजरपुरा पोलिसात रविवार, डिसेंबरला उशिरा रात्री तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने गोपाल तिरमारेविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाने खळबळ उडाली आहे.

 

शोधासाठी पथक रवाना
पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून गोपाल तिरमारेविरुद्ध आमिष दाखवून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तिरमारे चांदूर बाजार नगरपालिकेचा नगरसेवक असल्याची माहिती मिळाली. त्याच्या शोधासाठी आम्ही चांदूर बाजारला पथक रवाना केले.
- आसाराम चोरमले, ठाणेदार, फ्रेजरपुरा.

 

पैसे घे आणि दूर निघून जा
पीडितमहिलेसोबत ओळख झाली, त्यावेळी गोपालने स्वत: विवाहबद्ध असल्याचे महिलेपासून लपवून ठेवले. दरम्यान यांची मैत्री नंतर प्रेम झाले. भविष्यात गोपालच आपला आधार म्हणून या महिलेने सर्वस्व त्याला दिले. मात्र ज्यावेळी तिने लग्नासाठी गळ घातली, त्यावेळी गोपालने पूर्वीच लग्न झाले असल्याचे सांगून लग्नास नकार दिला तसेच काही पैसे घे आणि येथून दूर निघून जा, असे केले नाही तर मारून टाकेल अशी धमकी दिल्याचेही पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...