आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्ते, उड्डाणपुलासाठी २०१ कोटींची तरतूद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्याच्या अर्थसंकल्पात शहरातील प्रमुख रस्ते उड्डाणपुलांसाठी २०१.७२ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असून, यामध्ये मालवीय चौक ते नागपुरी गेट उड्डाणपुलासाठी ६० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याच बरोबर शहरातील अंत्यत वर्दळीच्या पंचवटी ते नवाथे चौक, रेल्वे स्टेशन ते चपराशी पुरा, चित्रा चौक ते इस्माईल कटपीस स्टोअर्स, रेल्वे स्टेशन ते इर्विन चौक रस्ता सुधारण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील वाहतुकीसाठी कायम अडथळ्याची शर्यत ठरलेला नागपुरी गेट ते मालवीय चौक रस्ता जनसामान्यांची कायम डोकेदुखी ठरला होता. रुंदीकरणाच्या मर्यादा वाहनांची वाढणारी संख्या यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतुकीचा खोळंबा होत होता. दरम्यान, या मार्गावर नागपुरी गेट ते मालवीय चौक उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. यासाठी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी केंद्रिय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या पुलासह विविध रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्याची विनंती केली होती. या अंतर्गत नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या उड्डाणपुलासाठी ६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या मार्गावर उड्डाणपुलाचा समावेश झाल्याने इतवारा बाजार परिसरातील होणारी वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. शहरातील विकासकामासाठी त्वरित निधी उपलब्ध करून दिल्याबाबत डॉ. देशमुख यांनी केंद्रियमंत्री गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार मानले आहे.

रुपयांची उड्डाणपुलांसाठी भरीव तरतूद
रेल्वे स्टेशन ते इर्विन चौक रस्ता सुधारणा
पंचवटी ते नवाथे चौक रस्ता सुधारणा
चित्रा चौक ते इस्माईल कटपीस स्टोअर्स रस्ता सुधारणा
रेल्वे स्टेशन ते चपराशी पुरा रस्ता सुधारणा
मालवीय चौक ते नागपूरी गेट उड्डाणपूल
बातम्या आणखी आहेत...