आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ष 2016 आणि 1988ची दिनदर्शिका ‘सेम टू सेम’, दर २८ वर्षांनंतर जुळून येताे योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नूतनवर्ष २०१६ ते १९८८ या वर्षांची दिनदर्शिका (कॅलेंडर) अगदी सारखीच असल्याची माहिती हजार वर्षांचे कॅलेंडर तोंडपाठ करण्याचा विक्रम नोंदवणारे प्रसिद्ध गणित तज्ज्ञ सुभाष दाभिरकर यांनी दिली आहे. २०१६ या वर्षातील प्रत्येक तारीख अन् वार हे १९८८ या वर्षातील तारीख अन् वाराशी साधर्म्य ठेवणारे आहे.

१९०९, १९१५, १९२०, १९२६, १९३७, १९४३, १९५४, १९६५, १९७१, १९७६, १९८२, १९९३, १९९९, २००४ २०१० या वर्षांमधील जानेवारी फेब्रुवारी महिना २०१६ या वर्षातील या दोन्ही महिन्यांप्रमाणेच म्हणजे प्रत्येक तारीख सारख्याच दिवशी आली आहे. ह्या वर्षातील मार्च ते डिसेंबर या कालावधीत एका दिवसाचा फरक पडतो. उदाहरणार्थ मार्च २०१० चा सोमवार होता, तर मार्च २०१६ चा मंगळवार असेल. कारण २०१६ हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारी महिना हा २९ दिवसांचा आहे. विशेष बाब अशी की, १९८८ मध्ये जानेवारी महिन्याची एक तारीख ही २०१६ प्रमाणे शुक्रवारीच आली आहे. १९८८ हे लीप वर्ष होते, त्यामुळे या वर्षातील मार्च महिन्याची पहिली तारीख मंगळवारी आली होती.

पुढे वाचा...
>२० व्या शतकातही असेच योगायोग
>सोमवारी मिळणार तब्बल सहा सुट्या