आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 22 Check Posts On State Border Set Latest Technology

राज्यात २२ सीमा चेक पोस्टवर अाधुनिक तंत्रज्ञान बसवले का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्य सरकारच्या २५ मार्च २००८ च्या परिपत्रकानुसार विविध सीमांवरील २२ चेक पोस्टवर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस (आरएफआयडी), संगणक असे आधुनिक तंत्रज्ञान बसवले का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्याचे परिवहन आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला केली आहे.
महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या आणि राज्याबाहेर जाणाऱ्या मालवाहू ट्रक आणि इतर वाहनांच्या तपासणीसाठी राज्याचा विविध भागात २२ चेक पोस्ट उभारले अाहेत. त्यापैकी बहुतांश चेक पोस्ट हे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर आहेत. या चेक पोस्टवर मालवाहू ट्रक आणि इतर वाहनांसाठी एक वेगळा रस्ता आहे. तरीही चेक पोस्ट ऑपरेटर्सनी सर्व लेनवर बॅरिकेड्स आडवे लावले आहेत. हे बॅरिकेड्स लावण्यासाठी ऑपरेटरने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची परवानगीही घेतली नाही. तसेच २००८ च्या परिपत्रकानुसार चेक पोस्टवर आरएफआयडी, संगणक बसवणार होते. त्यासाठी कोट्यवधींची तरतूद केली होती. परंतु अद्यापही हे आधुनिक तंत्रज्ञान बसवले नाही, अशा आशयाची जनहित याचिका परमजित कलसी यांनी दाखल केली.

भेट देऊन पाहणी करा
या याचिकेवर बुधवारी न्या. भूषण गवई आणि न्या. इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने परिवहन आयुक्त आणि ‘एमएसआरडीसी’च्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी माहिती सादर करावी, तसेच या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या दिवशी चेक पोस्टला आकस्मिक भेट देऊन तेथील कारभाराची पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश
दिले आहेत.