आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापूर तालुक्यात २३ हजार लाभार्थीच राॅकेलसाठी पात्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर - सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत येणाऱ्या ग्रामीण शहरी भागातील सुमारे ३९ हजार ७६९ शिधापत्रिकाधारकांपैकी २३ हजार १५२ लाभार्थीच रॉकेलसाठी पात्र ठरले आहेत. यापुढे स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना राॅकेलचे वितरण करण्यात येणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी दुसऱ्यांदा केलेल्या सर्वेक्षणादरम्यान ही आकडेवारी समोर आली असून, शासकीय आदेशाबाबत नागरिकांमध्ये अद्यापही जनजागृती झालेली नाही. यासाठी गेला महिनाभरापासून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार गॅसधारकांची माहिती गोळा करीत होते.
गोरगरीब जनता लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा रॉकेलच्या वितरणामध्ये सुसूत्रता यावी, या उद्देशाने अन्न नागरी पुरवठा विभागाने काही महिन्यांपूर्वीच एकेरी किंवा दुहेरी गॅसजोडणी असलेल्या गॅसधारक ग्राहकांना राॅकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्वेक्षण संबंधित विभागाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदारांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणांतर्गत १६ हजार ६१७ गॅसधारक ग्राहकांचा राॅकेलपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे आता फक्त २३ हजार १५२ लाभार्थीच राॅकेलचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले अाहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात फक्त लाभार्थ्यांनाच राॅकेलचे वितरण होईल. यापूर्वी तालुक्यातील ३९ हजार ७२५ शिधापत्रिकाधारक ग्राहकांसाठी लाख हजार लीटर राॅकेलची मागणी होत होती.
गॅसधारक ग्राहकांची संख्या कमी झाल्यानंतर ८६ हजार ३०० लीटरपर्यंत राॅकेल प्राप्त होत आहे. या मागणीतही मोठी घट होणार असल्याने येणाऱ्या काळात फक्त पात्र लाभार्थ्यांनाच राॅकेलचा पुरवठा होणार आहे. यामुळे राॅकेलचा होणारा काळाबाजार थांबेल गरजू बिगर गॅसधारकांना राॅकेल मिळण्यास मदत होणार आहे. पुरवठा विभागाच्या नवीन नियमानुसार शहरी ग्रामीण भागासाठी रॉकेल वाटपाचे जुने परिमाण रद्द करून आता दोन्ही भागातील बिगर गॅस शिधापत्रिकाधारकांसाठी नव्याने एकरूप परिमाण निश्चित करण्यात आले आहे. बहुतांश वेळा गॅसधारकांना राॅकेलची आवश्यकता भासते, परंतु यापुढे राॅकेल मिळणे शक्य होणार नाही. मात्र, बिगर गॅसधारक पात्र लाभार्थ्यांना यापुढे शंभर टक्के राॅकेलचा पुरवठा होणार आहे.
शासनाच्या नवीन निर्णयानुसार, गॅसधारकांना यापुढे राॅकेलचा पुरवठा केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र,शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील गॅसधारकांना नियमित गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जात नाही. महिन्यातील काही ठराविक दिवशीच गॅस सिलिंडरची गाडी गावामध्ये येते. तोपर्यंत गावकऱ्यांना चातकाप्रमाणे वाट पाहावी लागते. गॅस सिलिंडर मिळेपर्यंत ग्रामीण भागातील गॅसधारकांनी काय करावे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शिवाय, स्वस्त धान्य दुकानदारांना यापुढे राॅकेलचा मोजकाच साठा मिळणार असल्याने ग्रामीण भागातील गरजू निराधार कुटुंबांना मानवी दृष्टिकोनातून दिले जाणार राॅकेल आता मिळणार नाही. पर्यायाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत गरीब कुटुंबातील लोक पुन्हा स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनासाठी वृक्षतोडीकडे वळण्याची भीती तालुक्यातील पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

गॅसधारकांची राॅकेलसाठी खासगी डेपोमध्ये धाव अन् दुप्पट भाव
शासकीय नियमानुसार गॅसधारकांना राॅकेलचा पुरवठा बंद केला असला तरी घरात कधीतरी राॅकेलची गरज भासते. त्यामुळे अपात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांचा ओढा खासगी राॅकेल डेपोत वाढला आहे. त्यांना बाहेरून दुप्पट भावाने राॅकेल खरेदी करावे लागत आहे. दरम्यान, गॅस सिलिंडर घेणाऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले असता ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळत नाही.

नियमानुसार होईल राॅकेलचे वितरण
^सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नवीन धोरणानुसार यापुढे गॅसधारकांना केरोसीनचा लाभ मिळणार नाही, परंतु, बिगर गॅसधारकांना राॅकेलचे नियतन मिळणार आहे. बबन राठोड, तालुकापुरवठा निरीक्षक.

निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करावा
^सिलिंडरचातुटवडाकिंवा विद्युत पुरवठा खंडित झाल्यास राॅकेलची गरज प्रत्येकालाच भासते. त्यामुळे शासनाने विचार करून गॅसधारकांना महिन्याकाठी एक लीटर राॅकेल देण्यासंबंधी पुनर्विचार करावा, असे वाटते. मनोज गावंडे, नागरिक.

गॅस संपल्यावर उडणार महिलांची तारांबळ
^एकगॅस सिलिंडर असणाऱ्या ग्राहकांना वेळप्रसंगी स्टोव्ह हा पर्याय असतो, पण आता रॉकेलचाही पुरवठा बंद केला आहे. वेळेत सिलिंडर मिळाल्यास महिलावर्गाची चांगलीच तारांबळ उडणार आहे. प्रज्ञा बंडगर, गृहिणी.