आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुरांना घेऊन जाणारे भरधाव वाहन उलटले, २५ जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- संततधार पावसामुळे शेतीची कामे खोळंबल्याने शेतकऱ्यांना बाहेरगावच्या मजुरांकडून शेतीची कामे करून घ्यावी लागत आहेत. याच पद्धतीने मार्डी येथील २५ ते ३० शेतमजूर महिला पुरुषांना बाहेरगावी घेऊन जाणारे वाहन अचानक उलटल्याने झालेल्या अपघातात तब्बल २५ जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. हा अपघात मार्डीपासून अंदाजे किलोमीटर अंतरावर वीरगव्हाण गावाजवळ गुरूवारी (दि. ४) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करूनवाहनचालक गिरधर रामधर राठोड (२२ रा.मार्डी)याला ताब्यात घेतले आहे.

गिरधर राठोड याच्या मालवाहू वाहनामध्ये गावातील २५ ते ३० शेतमजूर बसून अंजनवती भागातील चेनुष्ठा दुर्गवाडा येथील शेतावर कामासाठी जात होते. यावेळी गिरधर राठोड हाच एम. एच. २७ एक्स ३१६१ क्रमांकाचे वाहन चालवत होता. भिवापूर ते वीरगव्हाणदरम्यान वाहन अचानक उलटल्याने वाहनाच्या ट्रॉलीमध्ये बसलेले सर्वच शेतमजूर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर काही जण वाहनात फसले होते. त्यावेळी याच गावातील याच मजुरांचे काही सहकारी दुसऱ्या दोन वाहनांने निघाले होते. ते दोन्ही वाहन याच वाहनाच्या मागे पुढे हाेते. वाहन उलटल्याचे लक्षात येताच ते आपआपले वाहन घेऊन अपघातग्रस्त वाहनाजवळ आले. त्यांनी वाहनात फसलेल्या मजुरांना बाहेर काढले. यावेळी २५ जणांना दुखापत झाली होती. सर्व जखमींना तातडीने मार्डीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तेथून पुढील उपचारादरम्यान अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखमीपैकी एकाला गंभीर दुखापत असल्यामुळे त्याला नागपूरला पाठवण्यात आले. अपघातग्रस्त वाहन हे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच नादात हा अपघात झाल्याचे अपघातग्रस्त वाहनाच्या पुढच्या वाहनात असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले. दरम्यान, प्रभारी ठाणेदार माधवराव गरूड घटनास्थळी धाव घेऊन वाहन चालकास अटक केली.

जखमींची नावे
लक्ष्मीगोरख राठोड (३०), नर्मदा पांडूरंग राठोड (६०), सुमित्रा दादाराव राठोड (६५), अनसिंग श्याम पवार (२२), दीक्षा सुधाकर राठोड (१४), बाली दिनेश आडे (२७), उमेश गेणलाल राठोड (१९),मनू तुकाराम आडे (२७), दिनेश आडे (३०), दुर्गा अशोक राठोड (३२), लाला पवार (६०),वसंती पुरूषोत्तम राठोड (३६), निर्मला सुखदेव आडे (३०),देविदास धनसिंग चव्हाण (४०), उमा रमेश भोसले (६०), भारत भोसले (६०), रवि सुधाकरराव राठोड (१५), सुपी गुलाबराव राठोड (४०), शालू सदुराम राठोड (३०) आणि सुनंदा परशराम राठोड (३४, सर्व रा.मार्डी) असे जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

चालकाला केली अटक
अपघाताची माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी पोहचलो. अपघातातील सर्व जखमींवर इर्विनमध्ये उपचार सुरू आहे. या प्रकरणात वाहन चालकाला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. माधवरावगरूड, प्रभारी ठाणेदार, कुऱ्हा.
बातम्या आणखी आहेत...