आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: जुन्या वादातून 26 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या, पाटीपुरा परिसरातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- यवतमाळ शहरातील पाटीपुरा परिसरात एका सव्वीस वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करणात आली. ही घटना मंगळवारी रात्री साडेसाठच्या सुमारस घडली. अनिल उर्फ हनीसिंग विजय थूल (वय- 26, रा. पाटीपुरा, यवतमाळ) असे मृत तरूणाचे नाव आहे.
 
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ शहरातील पाटीपुरा परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून अनिल उर्फ हनीसिंग थूल या 26 वर्षीय तरुणाची अज्ञात मारेक-यांनी धारदार शस्राने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना पाटिपूरा परिसरातील सम्राट अशोका चौक परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारात उघडकीस आली. 
 
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यशवंत बाविस्कर, सहायक पोलीस निरीक्षक मिलन कोयल यांच्यासह टोळी विरोधी पथक, शहर डिबी पथक यासह विविध पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी बुधवारी दुपारपर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.
बातम्या आणखी आहेत...