आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर गारपीट ग्रस्तांसाठी २९ कोटी रुपये केले मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या तुफान गारपिटीमुळे पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने नुकतेच २९ कोटी रुपये मंजूर केले असून, लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप केले जाणार आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी-मार्च मध्ये झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे संत्रा, हरभरा, गहू आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. यात केळी, संत्रा, पपई आदी फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाने नुकसानग्रस्त तालुक्याचे सर्वेक्षणही केले होते. परंतु तब्बल नऊ महिने उलटूनही गारपीटग्रस्तांना दमडीचीही मदत मिळू शकली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी संताप व्यक्त केला जाता होता. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे शासनाने २० सप्टेबर रोजी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २९ कोटी लाख ५० हजार रुपयांच्या मदतीसाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांनी ही मदत वाटप करण्यात येणार आहे. गारपीट वादळी पावसामुळे जिल्ह्यात ३४ हजार ९२५ शेतकऱ्यांच्या १८ ६५४ हेक्टरवरील पिक गारद झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. परंतु आता शासनाने मदतनिधीसाठी मंजुरी दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मदतीच्यारकमेतून बंॅकांना कर्जवसूल करण्यास मनाई: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार असून मदतीच्या रकमेतून कोणत्याही बंॅकेने कर्जवसुली करू नये असे निर्देश शासनाने काढलेल्या आदेशात दिले आहे.

बाधीत शेतकरी : ३४,९२५.
बागायती क्षेत्राला मिळणारी मदत : १३,५०० प्रति हेक्टर.
बहुवार्षिक पिकांना मिळणारी मदत : १८,००० प्रति हेक्टर.
मंजुरी मिळालेला एकूण निधी : २९ कोटी लाख ५० हजार रुपये.
बातम्या आणखी आहेत...