आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याला लाच मागणाऱ्या कंत्राटी तांत्रिक अधिकाऱ्यासह दोघे गजाआड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मोर्शी पंचायत समितीला कंत्राटी तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका तांत्रिक अधिकाऱ्याने एका शेतकऱ्याला विहीर दुरूस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक काढण्यासाठी दहा हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ही रक्कम आठ हजार ठरली खासगी व्यक्तीच्या माध्यमातून ही लाच स्विकारण्यात येणार होती मात्र संशय आल्यामुळे ही रक्कम स्वीकारली नाही. दरम्यान, लाचेची मागणी केल्याप्रकरणी या कंत्राटी तांत्रिक अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीला अमरावती एसीबीच्या पथकाने शुक्रवारी (दि. १) अटक केली आहे. 
 
कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रवीण श्रीरामजी भोयर (३१) आणि प्रशांत सुभाषराव वाघमारे (३२, रा. हिवरखेड) या दोघांना एसीबीने अटक केली आहे. एका गावातील शेतकऱ्याने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून शेतातील विहीर दुरूस्ती कामाचे अंदाजपत्रक काढण्याचे काम तांत्रिक अधिकारी भोयर यांच्याकडे होते. भोयर यांनी शेतकऱ्याला दहा हजार रुपये लाच मागितली. त्यावेळी ही रक्कम आठ हजार रुपये खासगी व्यक्ती प्रशांत वाघमारे याच्याकडे देण्यास सांगितली. दरम्यान या शेतकऱ्याने ११ ऑगस्टला लाच लुचप्रत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रार प्राप्त झाल्यामुळे एसीबीच्या पथकाने दोनवेळा पडताळणी केली. त्यावेळी रक्कम मागितल्याचे स्पष्ट झाले. मात्र रक्कम स्वीकारण्यापुर्वी भोयरला संशय आल्यामुळे त्याने किंवा वाघमारेव्दारे लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागितल्याचे पुढे आल्याने शुक्रवारी एसीबीच्या पथकाने या दोघांनाही ताब्यात घेतले. 
बातम्या आणखी आहेत...