आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील दरोडा प्रकरणामध्ये यवतमाळातील तीघे अटकेत, पोलिस टोळी विरोधी पथकाची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- पुणे जिल्ह्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील दरोडा प्रकरणात आज, दि. ११ जूलै रोजी यवतमाळातील तीघाजणांना अटक करण्यात आली. ही कारवाई रांजणगाव पोलिस आणि यवतमाळ येथील टोळी विरोधी पथकाने संयुक्तरित्या पार पाडली. रौनक यादव, सोनू ठाकूर आणि करण पवार तीघेही रा. जामनकर नगर अशी आरोपींची नावे आहेत.
 
सुरेश सोनआंबटे रा. पंढरीनाथ नगर, शिर्डी यांनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनूसार, दि. १६ जून रोजी सोनआंबटे हे स्वीफ्ट डिझायर कारने पुणे येथून नगर मार्गाने शिर्डीकडे जात होते. दरम्यान वाटेतील खराडी बायपासजवळ पाचजणांनी वाहन अडवून लिफ्ट मागीतली. त्यानंतर गाडी थोडी समोर गेली असता त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवून गाडीवर ताबा मिळवला. तसेच सुरेश सोनआंबटे यांचे हात बांधून त्याना मारहाण केली. दरम्यान रांजणगाव येथील गणपती मंदिर परिसरात येवून सुरेश सोनआंबटे यांच्याजवळील रोख चार हजार पाचशे रूपये आणि स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एमएच-१७-एजे-६९४६ जबरीने दरोडा टाकून चोरून नेली. या प्रकरणी रांजणगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अज्ञात आरोपीविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला.

दरम्यान मंगळवार, दि. ११ जूलै रोजी रांजणगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक एम. आर. पाटील त्यांचे पथक दरोडा प्रकरणाच्या तपासातील संशयीत आरोपींचा शोध घेण्यासाठी यवतमाळात आले. त्यानंतर टोळी विरोधी पथकासह त्यांनी जामनकर नगरातील रौनक यादव, सोनू ठाकूर आणि करण पवार या तिघांना ताब्यात घेवून संबंधीत दरोडा प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी तीघानाही पोलिसांना गुन्हा केल्याची कबूली दिली. या तिघांना पुढील कारवाईसाठी पुणे पोलिसंाच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, एससीबी पोलिस निरिक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक प्रशांत गिते, रांजणगाव ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक एम. आर. पाटील इतरांनी पार पाडली.
 
बातम्या आणखी आहेत...