आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच रात्री तीन घरफोड्या, हरिओम कॉलनीमध्ये चोरट्यांची दहशत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात वाढलेल्या चोरीच्या घटना काही दिवस कमी झाल्या होत्या. मात्र चोरट्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील साईनगर भागातील हरिओम कॉलनीत सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी तीन घर फोडले आहे.
 
यावेळी एकाच घरातून चोरट्यांनी तब्बल दोन लाखांच्या आसपास ऐवज लंपास केला आहे. तर उर्वरीत दोन घरातील सदस्य शहरात नसल्यामुळे त्यांच्या घरातून चोरीला गेलेल्या ऐवजाबाबत तुर्तास माहीती समोर आली नाही.हरिओम कॉलनीमध्ये राहणारे अमोल रमेशसिंग चव्हाण (३३) यांच्या घरात चोरट्यांनी स्वंयंपाक खोलीची ग्रील तोडून प्रवेश केला. यावेळी अमोल त्यांच्या पत्नी पहील्या माळ्यावर तर घरातील इतर सदस्य खाली झोपले होते.

सोमवारी मध्यरात्री पाऊस सुरू होता. याच दरम्यान चोरटे घरात घुसले. त्यांनी चव्हाण यांच्या घरातील तीन आलमारीमधून सोनसाखळी २० ग्रॅम, अंगठी १५ ग्रॅम, मंगळसूत्र ३५ ग्रॅम, कानातील झुमके ग्रॅम, नथ एक ग्रॅम, सोन्याचीच अंगठी सहा ग्रॅम, चांदीचे दागिने ९२ ग्रॅम, दहा हजारांच्या तीन घड्याळ तसेच २१ हजार २१० रुपयांची रोख असा एकूण लाख ९४ हजार ११० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही चोरी मध्यरात्री बारा ते अडीच दरम्यान झाली.मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास अमोल यांच्या आईंना चोरी झाल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. अमोल घरातच समोरच्या बाजूने इलेक्ट्रीकचे साहीत्य विक्रीचे प्रतिष्ठाण आहे. 
 
शहर पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान 
शहरातील चोऱ्या थांबवणे झालेल्या चोरीमधील चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीपींनी १६ पोलिसांचे स्वतंत्र पथक तयार केले आहे. असे असतानाही चोरटे बिनधास्त चोऱ्या करीत असल्याने पोलिसांसमोर आता चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...