आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती : युवकाला नोकरीच्या नावावर 3 लाख 13 हजारांनी फसवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती : शहरातील किरणनगर क्रमांक 2 मध्ये राहणाऱ्या एका युवकाला समाजकल्याण विभागात शिपाई म्हणून नोकरी लावून देतो, असे सांगून तब्बल 3 लाख 13 हजारांनी फसवले असल्याची घटना नुकतीच समोर आली. या प्रकरणी युवकाच्या आईच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी दोघांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
अभय राजेन्द्र कडू (पुर्वा टाऊनशिप, शेगाव नाका, अमरावती) आणि ओम्कार विठ्ठलराव दराळकर (रा. प्रभादेवी मंगल कार्यालयाजवळ, राजापेठ, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. रुपेश रामदास भगत याला समाजकल्याण विभागात शिपायाची नोकरी लावून देतो, असे सांगून अभय ओम्कार यांनी टप्प्याटप्प्याने रुपेशच्या आईकडून लाख १३ हजार रुपये घेतले. मात्र नोकरी दिली नाही. यावेळी महाराष्ट्र शासनाचे खोटे कागदपत्र दिले. नोकरी लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अभय कडू ओम्कार दराळकरविरुध्द रुपेशची आई शोभाबाई भगत यांनी सोमवारी (दि. 12) फ्रेजरपुरा पेालिसात तक्रार दिली आहे.