आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपकमांडरसह २ महिला नक्षली चकमकीत ठार, गडचिरोलीच्या जंगलात कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गडचिरोलीच्या अटापल्ली तालुक्यात सेवारी गावानजीकच्या जंगलात रविवारी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत कसनसूर दलमच्या महिला उपकमांडरसह दोन महिला नक्षलवादी ठार झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, रविवारी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या. त्यात निर्मला ऊर्फ सविता धुर्वे (वय २५) रा. नैनगुडा व आरती ऊर्फ सीताई बिसरू पुडो (वय ३०) रा. रानकट्टा यांचा समावेश आहे. निर्मला धुर्वे ही कसनसूर दलमची उपकमांडर होती. सन २००२ मध्ये ती दलममध्ये भरती झाली. खून, जाळपोळ, अपहरण, गोळीबार अशा ४० गुन्ह्यांमध्ये तिचा समावेश होता. तिच्या डाेक्यावर पोलिसांनी सहा लाखांचे इनाम ठेवले होते, असेही त्यांनी नमूद केले. आरती ऊर्फ सीताई बिसरू पुडो ही नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा सचिव जोगन्ना याची दुसरी पत्नी होती. सन २००२ मध्ये ती दलममध्ये भरती झाली. विविध प्रकारचे ८० गुन्हे दाखल असलेल्या आरतीवरही ६ लाखांचे बक्षीस होते. दोघींच्या मृत्यूमुळे नक्षलवादी चळवळीला जबर हादरा बसल्याचा दावा पोलिस अधीक्षकांनी केला.
चकमकीनंतर पोलिसांनी केलेल्या घटनास्थळाच्या पाहणीत एक ३०३ रायफल, १ बारा बोअर रायफल, एक क्लेमोर माईन व स्फोटके, ३०३ रायफलीची ७ काडतुसे, १२ बोअर रायफलीची ९ जिवंत काडतुसे, एक मस्केट, ४ पिट्टू, औषधी, एक कॅमेरा फ्लॅश व अन्य साहित्य आढळून आले.
बातम्या आणखी आहेत...