आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील 30 टक्के शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची ‘डेटलाईन’ अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात केवळ ७० टक्के कर्जदार शेतकऱ्यांनी ‘ऑनलाइन’ अर्ज दाखल केले आहे. उवरीत ३० टक्के पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याने इंटरनेट केंद्रावरील शेतकऱ्यांच्या रांगा अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांना विहित मुदतीत कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करता येणार की नाही, हा प्रश्न चर्चिल्या गेला आहे. 
 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २००९ ते २०१७ अंतर्गत कर्जमाफी, प्रोत्साहनपर इतर लाभ मिळवण्यासाठी अर्ज तथा घोषणापत्र मोफत ऑनलाइन भरण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने आपले सरकार पोर्टल केंद्र, सीएससी सेंटर या ठिकाणी सुविधा करण्यात आली होती. असे असलेतरी सर्व्हरडाऊन असल्यामुळे जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. विशेष म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांनी खासगी केंद्रावरूनसुद्धा अर्ज भरून घेण्याचा खटाटोप केला. त्यामुळे तासनतास रांगेत उभे राहून शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. विशेष म्हणजे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दि. १५ सप्टेंबर २०१७ ची मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली. एकूण लाख हजार ५८५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. तर सद्यस्थितीत लाख हजार ५२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केला आहे. प्रामुख्याने आज, दि. १३ सप्टेंबर रोजी दिवसभरात हजार २३० शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्व्हरडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज दाखल करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. विशेष म्हणजे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची फि आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश जारी करण्यात आले होते. मात्र, बऱ्याच ठिकाणी पैस मागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर पावले उचलण्यात आली. कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत दि. १५ सप्टेंबर असून, तत्पूर्वी संपूर्ण शेतकऱ्यांना अर्ज भरता येणार काय? , असा प्रश्न सध्या उपस्थित केल्या जात आहे. 
 
शासनाने दिलेल्या कर्जमाफभ्चा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करताना नेटवर संपूर्ण गावांची नावे अपलोड करण्यात आलेली आहे. असे असले तरी दारव्हा तालुक्यातील सांगलवाडी, तेलधारी, खंड एक, चे नाव यादीत नव्हतेच. या प्रकारामुळे जवळपास दोनशे ते तीनशे शेतकरी अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहिले होते. दरम्यान, महसूल तसेच जिल्हा उपनिबंधक प्रशासनाकडून वरिष्ठ पातळीवर याची माहिती देण्यात आली. तद्नंतर आज, दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्या गावांची नावे अपलोड करण्यात आली. आता त्या शेतकऱ्यांचेही कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारल्या जाणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...