आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील 31 हजार कुटूंब अंधारात, वंचित कुटुंबांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी महावितरणची योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - रस्ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधा प्रत्येक व्यक्तीला मिळाल्या पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील असले तरी स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर अजूनही जिल्ह्यातील ३१ हजार कुटूंब अंधारातच जीवन जगत आहेत.दरम्यान, विजेपासून वंचित असलेल्या या कुटूंबांपर्यत वीज पोहोचविण्यासाठी महावितरण कंपनीने कंबर कसून कोट्यवधी रुपयांच्या कामांना सुरूवात केल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
जिल्ह्यात एकूण २०२१ गावे आहेत. त्यापैकी १९९८ गावांमध्ये दाट नागरी वस्ती आहे तर २३ गावे असे आहेत की, ज्या गावांमध्ये नागरी वस्ती अंत्यत विरळ आहे, काही गावांमध्ये तर चार, पाचच घरे गाहेत. यातही ही गावे अत्यंतय दुर्गम भागात आहे. २०२१ गावांमध्ये लाख ४४ हजार ६०७ घरे आहेत. त्यापैकी लाख १३ हजार ५०९ घरापर्यंत वीज पोहचल्याचा महावितरणचा दावा आहे. मात्र अजूनही ३१ हजार ९८ घरांमध्ये वीज पोहचली नाही,हे वास्तव आहे. आगामी काळात या घरांमध्येसुध्दा वीज पोहचवण्यासाठी महावितरणने योजना आखली असून त्याचे कामसुध्दा सुरू झाले आहे. दीनदयाल उपाध्याय योजनेतंर्गत शासनाकडून हे काम हाती घेण्यात आले आहे. विजेपासून वंचित ३१ हजार ९८ कुटुंबांना अखंडीत वीज देण्यासाठी महावितरणने दोन टप्प्यात काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
पहिल्या टप्प्यात ३७ कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. काम सुटसुटीत योग्य पद्धतीने पार पडावे म्हणून पहिल्या टप्प्याच्या कामांना ‘पार्ट ए’ आणि ‘पार्ट बी’ मध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील दोन्ही पार्टचे काम प्रगतीपथावर असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. पार्ट मध्ये ११ उपकेंद्र, एक पॉवर ट्रान्सफार्मर, २९१ किलोमीटरची वीजवाहिनी आहे. यामध्ये ३३ केव्ही आणि ११ केव्हीच्या वीजवाहिनीचा समावेश आहे.
 
पार्ट बी च्या कामासाठी ३३ कोटी रुपयांचा निधी खर्च होणार असून यामध्ये ४३२ किलोमीटरची ११ केव्हीची वीजवाहीनी टाकण्यात येणार आहे. तसेच १४४ किलोमीटरच्या लघुदाब वीजवाहिनीचे काम होणार आहे. याचवेळी ४३६ ट्रान्सफार्मर नव्याने बसविण्यात येणार असून पाच ट्रान्सफार्मची क्षमता वाढवण्यात येणार आहे. याच टप्प्यात पाच एसडीटी (स्पेशल डिझाईन ट्रान्सफार्मर) बसविण्यात येणार आहे. जिल्ह्यात कृषी पंपासाठी करण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात भारनियमन आहे.

मात्र काही घरगुती वीज पुरवठा हे कृषीसाठी असलेल्या ट्रान्सफार्मरवरून देण्यात आले आहे. ज्या घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा हा कृषी ट्रान्सफार्मर उर्वरित.पान
 
‘एबी’ केबल रोखणार वीजचोरी
अनेक भागात वीजचोरी केली जाते. भरारी पथक दोषींवर कारवाई करते. मात्र वीजचोरी थंाबवणे एखादा भागात कठीण होऊन जाते. मात्र या योजनेतंर्गत करण्यात येणाऱ्या कामाच्या पार्ट बी मध्ये जवळपास दीड किलोमीटर ‘एबी’ (एअरबंच) केबल वापरण्यात येणार आहे. या केबलमुळे वीजचोरीला आळा बसणार आहे.
 
70 कोटी रुपयांच्या कामांना झाली सुरूवात
- पहिल्या टप्प्यातील पार्ट ‘ए’ साठी निधी: ३७ कोटी ६० लाख
- पहिल्या टप्प्यातील पार्ट ‘बी’ साठी निधी: ३३ कोटी
- नव्याने टाकल्या जाणाऱ्या वीजवाहिनीचे अंतर: ८६७ कि.मी.
- जिल्ह्यातील गावे: २०२१
- घरांची संख्या: ४,४४,६०७
- वीज पोहचलेली घरे: ४,१३,५०९
- वीज नसलेली घरे: ३१,०९८
 
४६४१ बीपीएल कुटूंबांचाही समावेश
अद्यापही वीज पुरवठा मिळालेल्या ३१ हजार ९८ कुटूंबांमध्ये जवळपास हजार ६४१ कुटूंब हे बीपीएलधारक असल्याची माहिती महावितरणनने दिली आहे. या योजनेतंर्गत त्यांनाही वीजपुरवठा देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबापर्यंत वीज पोहचवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
 
दीड वर्षात होणार पहिला टप्पा पूर्ण
योजनेच्या पहिल्या टप्प्यात पार्ट ‘ए’ पार्ट ‘बी’ अशा पद्धतीने काम करण्यात येणार असून दोन्ही पार्टचे काम जिल्ह्यात सुरू झाले आहे. पहिल्या टप्यातील दोन्ही पार्टमधील काम पूर्ण करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे.’’
- दिलीप मोहोड, प्रभारी अधीक्षक अभियंता,महावितरण कंपनी
 
बातम्या आणखी आहेत...