आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 33 प्रकारचे साप, त्यातील सहाच आहेत विषारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सापांच्या बाबतीत आपला प्रदेश संपन्न असून, अमरावती जिल्ह्यात एकूण ३३ प्रकारचे साप आढळून येतात. यापैकी फक्त सहा प्रकारचे सापच विषारी असल्याची माहिती जागतिक सर्पदिनाच्या पूर्वसंध्येला सर्पमित्रांनी दिली आहे. पावसाळा सुरू झाला की सापांचा मुक्त संचार वाढतो. मनुष्य वस्त्यात त्यांचा मुक्त वावर हे स्वस्थ पर्यावरणाचे प्रतिक आहे.

साप अन्नसाखळीतील महत्वाचा घटक आहे. परिसंस्था सुदृढ ठेवण्यात सापांचा मोलाचा वाटा आहे. साप शेतातील उंदरांना खातो, म्हणून तो शेतकऱ्यांचा मित्र देखील ठरतो. सापांचा परिसंस्थेतला वावर निसर्ग संतुलनात अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी सापाला घाबरता, त्याला डिवचता साप दिसल्यास तत्काळ सर्प मित्रांना फोन करून सापांच्या संरक्षणाला हातभार लावण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
 
सर्पदंश टाळण्यासाठी उपाय: बुटाचा वापर करावा. उंच दाट गवतातून चालू नये. स्वयंपाक खोलीत इतर अडगळीच्या ठिकाणी सामान काढताना निट पहावे. नजर जात नसेल अश्या ठिकाणी किंवा अंधाऱ्या ठिकाणी हात टाकू नये. ओसाड विहिरीमध्ये पोहू नये. इंधन, सरपण विटा काढताना लक्ष द्यावे. रात्री टॉर्चचा वापर करावा. दार उघडताना निट पाहून प्रवेश करावा. साप दिसल्यास घाबरून न जाता लगेचच सर्पमित्राला फोन करावा. सर्पमित्र येईपर्यंत सापावर सुरक्षित अंतर ठेवून पाळत ठेवावी.
 
जिल्ह्यात आढळणारे विषारी साप
नाग, मण्यार, फुरसे, घोणस, वेनुनाग, पोवळा,निमविषारी साप-हरणटोळ,उडता सोनसर्प, भारतीय अंडीखाऊ साप, मांजऱ्या, रेतीसर्प.बिनविषारी साप-अजगर, खापरखवल्या, मांडोळ, कवड्या, कुकरी, गवत्या, पानदिवड, विरोळा, सोंगट्या, धामण, तस्कर, नानेटी.
 
सर्पदंश झाल्यास काय करावे: सर्पदंश झाल्यास त्वरित नजीकचे शासकीय रुग्णालय गाठावे. घाबरून न जाता मानसिक शारीरिक रित्या स्थिर राहावे. सर्पदंश झाला असला तरीही सापाकडे निरखून पहावे. कारण बरेचदा डॉक्टरांनी विचारल्यास सापाचे वर्णन सांगता येत नाही. सर्पदंश झालेल्या ठिकाणी जखम सतत पाणी साबणाने स्वच्छ धुवावे. घाबरल्यास रक्ताभिसरणात जोराने विष पसरते.
 
साप महत्त्वाचा घटक
सापदिसल्यास घाबरू नका. सर्पमित्रांना बोलवा सर्पमित्र येईस्तोवर सापावर लक्ष ठेवा. उंदीर, पाल यांच्या संख्येवर साप नियंत्रण ठेवतात. पर्यावरण संतुलनात सापांची भूमिका महत्वाची आहे.
- यादव तरटे, सर्पमित्र तसेच वन्यजीव अभ्यासक.
बातम्या आणखी आहेत...