आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधर मतदारसंघात नोंदणीस उरले ३५ दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती विभाग पदवीघर मतदारसंघातील लाख ९१ हजार मतदारांची यादी रद्दबातल ठरल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांची नोंदणी करताना राजकीय पक्षांची आता दमछाक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या निर्देशानुसार पदवीधर मतदारसंघात मतदान करण्याकरिता पात्र असलेल्या सर्व मतदारांना आता ऑक्टोबर महिन्यात नोंदणी करावी लागणार आहे. याकरिता केवळ ३५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

याच ३५ दिवसात मतदारांचे अर्ज भरणे, आवश्यक कादगपत्रे जोडणे आणि तपासणी करणे अशी सर्वच कामे करावयाची असल्याने ही नोंदणी करताना राजकीय पक्ष आणि शिक्षक संघटनांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाकरिता नोंदणी करण्यासाठी मतदारांकडे २०१३ पूर्वीची पदवी असणे गरजेचे आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्यांमधील ५६ तालुक्यांमध्ये सर्व तहसील केन्द्रावर मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या ऑक्टोबरपासून ही नोंदणी सुरू होणार आहे. ऑक्टोबर २०१६ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत पदवीधर निवडणुकीकरिता मतदार नोंदणी करावयाची आहे. तर ३० डिसेंबर २०१६ ला या नव्या अंतिम मतदार यादीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. मतदार नोंदणीचा हा नवा कालावधी ३५ दिवसांचा असल्याने अधिकाधिक पदवीधर मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन राज्याचे गृराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी केले. हे दोघेही ही निवडणूक लढवत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदार याद्यांबाबत दिलेल्या एका निर्णयाच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीचा हा नवा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मतदार नोंदणी कमी होण्याचा धोका
मतदारांचीनोंदणी करण्याकरिता केवळ ३५ दिवसांचा कालावधी असल्याने नोंदणी कमी होण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे मागील वर्षभरात ज्या मतदारांनी नोंदणी केली आहे त्या सर्व मतदारांना पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. मागील वर्षभरात सुमारे ६० हजार मतदारांनी नोंदणी केली. सर्व मतदारांचे नावे यादीमध्ये प्रकाशित झाली होती.
बातम्या आणखी आहेत...