आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड येथील अपघातात महाराष्ट्राचे 4 भाविक जागीच ठार, 6 जखमी; सर्व पीडित अमरावतीचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती / न्यु टेहरी - उत्तराखंडच्या टेहरी येथे महाराष्ट्रातील भाविकांची एक मेटाडोर व्हॅन दरीत कोसळून 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत इतर 6 जण जखमी असून त्यापैकी एकाची परिस्थिती गंभीर आहे. सर्वच पीडित अमरावती येथील रहिवासी असून त्यांचे वाहन यमुनोत्रीहून केदारनाथला जात असताना एलकेसी मोटर मार्गावर चंगोरा बंद जवळ दरीत कोसळले. 
 
टेहरीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास हा अपघात घडला. यात सर्वच जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी एक गंभीर आहे. 

अपघातातील मृतांची नावे
1) चंद्रकांत सीताराम कारकर, वय 61, विद्युतनगर, अमरावती
2) कुंदादेवी चंद्रकांत कारकर, वय 50, विद्युतनगर, अमरावती
3) मीनाताई सुधाकर मुरारी, वय 48, विद्युतनगर, अमरावती
4) संजय पाटील, वय 57, वसुंधरा कॉलनी, अमरावती
 
जखमींची नावे
1) सतीश राऊत, वय 53, धामणगाव
2) श्रीमती अर्चनादेवी राऊत
3) कु. आर्या सतीश राऊत
4) पूर्णिमा वैभव, वय 50
5) सुधाकर राऊत, वय 55
 
6 व्या जखमीच्या नावाचा अद्याप पत्ता लागलेला नाही. ही माहिती नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राने दिली.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...