आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: महाराष्ट्र वन मिलियन फुटबॉल मिशनमध्ये जिल्हाभरात खेळले 40 हजारांवर विद्यार्थी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘महाराष्ट्र वन मिलियन फुटबॉल मिशन’अंतर्गत उत्साहात झालेल्या क्रीडा सोहळ्यात सुमारे सात हजार मुलांनी हजेरी लावून शुक्रवारी (दि. १५) या मिशनचा शुभारंभ केला. जिल्ह्यातही या मिशनला धूमधडाक्यात सुरुवात करण्यात येऊन सुमारे ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी खेळात सहभाग घेतला. 
 
विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख होत्या. मिशनचे उद््घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी निलीमा टाके, डॉ. गोविंद कासट आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ‘गोल’ करून या क्रीडा सोहळ्याचा शुभारंभ केला. यावेळी पोटे म्हणाले, ‘फुटबॉल मिशन वन मिलियन’द्वारे क्रीडा क्षेत्रात देशाला अधिक उंचावर नेण्याचे शासनाचे ध्येय आहे. या कार्यक्रमाअंतर्गंत जिल्ह्यातील शाळांमध्ये सुमारे दोन हजार फुटबॉलचे वाटप करण्यात आले. यानिमित्त शाळांमधून फुटबॉलवर आधारीत चित्र, निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

यावेळी मैदानावर ७२ फुटबॉल संघांनी १४ मैदानात खेळाचे कौशल्य दाखविले. इंडिपेंडंट फुटबॉल क्लब, पंचमुखी फुटबॉल क्लब, अभ्यासा स्कूलच्या खेळाडूंनी प्रमोशनल साँगवर फुटबॉल कौशल्य सादर केले. मिशननिमित्त जिल्ह्यातील १४०० मैदानावर हजार सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते.क्रीडाशिक्षक मोहन इंगळे यांनी आपल्या सुंदर आवाजात फुटबॉल गीत सादर केले. या मिशनमध्ये विविध संघांना क्रीडा विभागाकडून फुटबॉलचे वितरण करण्यात आले होते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पालकमंत्री पोटे यांनी स्वत:कडून खेळाडूंना दोनशे फुटबॉल उपलब्ध करुन दिले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हरिहर मिश्रा, मिलोकसिंह चंदेल, दिनेश म्हाला, जे. के. चौधरी आदींनी सहकार्य केले. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, क्रीडा अधिकारी नरेश बुंदिले, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू स्वाती बाळापुरे, दीक्षा गायकवाड, मंगेश व्यवहारे त्याचप्रमाणे अमरावती महानगर क्रीडा संघटनेचे अजय आळशी, शिवदत्त ढवळ, संतोष असेरा, महेश अलोने, अजय केवाडे, विजय मानकर, शरद गडीकर, संदेश गिरी, सचिन देवळे, निरंजन डाफ, दिलीप तिडके, हाफीज खान, नईम वकील अहमद, गजेंद्र अवघड, मंगेश व्यवहारे, अशोक श्रीवास, दिनेश देशमुख, प्रफुल्ल मेहता, मेहंदी अली, डॉ. सतीश पहाडे, राजु पाटील उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...