आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : ट्रक उलटून 42 गुरे ठार, मध्य प्रदेश सीमेवर अमरावती जिल्ह्यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जनावरांची वाहतूक करणारा दहाचाकी ट्रक एका वळणावर उलटल्याने गाडीतील ४२ गुरे जागीच ठार झाली. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील चिंचकुंभजवळ (जि. अमरावती) शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून ट्रकमधील केवळ दोन जनावरे बचावली अाहेत. विशेष म्हणजे वाहतूक करताना अावाज करू नये म्हणून तोंड व पाय बांधून अमानुषपणे या जनावरांना ट्रकमध्ये कोंबण्यात आले होते. दरम्यान, गाेवंश हत्याबंदी कायद्याचे उल्लंघन करूनच ही जनावरांची वाहतूक हाेत हाेती, असा अाराेप विश्व हिंदू परिषद व गाैरक्षा संघटनेच्या वतीने करण्यात अाला.

शुक्रवारी मध्य प्रदेशातून एक ट्रक (एमपी ०४ एचएफ ३५७४) चेकपोस्ट पार करून महाराष्ट्रात येत हाेता. ब्राह्मणवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंचकुंभजवळ हे वाहन उलटले. या वेळी ट्रकमधील ४४ पैकी ४२ बैल, गाेऱ्हे जागीच ठार झाले. ट्रकमध्ये सागवानाच्या पाट्या असल्याची प्राथमिक माहितीही मिळाली आहे. ट्रकखाली दबलेली जनावरे बाहेर काढण्यासाठी नागरिक, विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणे, अपघात करून गुरांचा मृत्यू होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी फरार ट्रकचालकावर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तब्बल सहा तास चालला अंत्यविधी
घटनेची माहिती मिळताच पंचक्राेशीतील विहिंप, बजरंग दल व गौरक्षणचे ४०० कार्यकर्ते घटनास्थळी अाले. दोन जेसीबीच्या मदतीने त्यांनी अपघातस्थळाजवळील शेतात माेठे तीन खड्डे खाेदून त्यात जनावरांचे दफन केले. अंत्यविधीचे हे काम तब्बल ६ तास सुरू होते.

विहिंपकडून संताप
‘राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. असे असतानादेखील मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मागील १५ दिवसांत ग्रामीण भागात अवैध प्रकारे गोवंशाची हत्या करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनेतूनही गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याचे स्पष्ट हाेते. संबंधितांवर कारवाई करावी,’ अशा मागणीचे निवेदन विहिंप, गाैरक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा व्‍हिडिओ, फोटोंमध्‍ये पाहा कसा उलटला ट्रक...