आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील 450 शिक्षकांना शासन निर्णयाचा फटका, राज्य शासनाने निम्म्या तासिका केल्या कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह आॅलिम्पिकमध्ये देशातील खेळाडूंनी देशाचा झेंडा फडकवावा प्रतिष्ठा वाढवावी या हेतुने कधीकाळी शाळांमध्ये नेमलेल्या शारीरिक शिक्षकांच्या निम्म्या तासिका कमी होणार असल्यामुळे या शिक्षकांचे बळ कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासोबतच कला शिक्षकांचे सप्तसूर कुंचल्यांची धारही बोथट होण्याच्या मार्गाला लागली आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयाविरुद्ध लवकरच आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा कला क्रीडा शिक्षकांनी दिला आहे.
 
डिजिटल इंडियाच्या नावाखाली राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने मागचा-पुढचा विचार करता २८ एप्रिल २०१७ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील शाळांमध्ये कला शारीरिक शिक्षकांच्या दर आठवड्याच्या तासिका चारवरून दोनवर आणल्या. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या चार तासिका आठवड्याला कमी पडायच्या म्हणून राज्यभरातूनच तासिकांची संख्या सहा करण्यात यावी अशी मागणी जोर धरत असताना त्यांची संख्या दोनपर्यंत घटवण्यात आल्यामुळे खेळाडूंसह विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण तास कमी केल्यामुळे जिल्ह्यातील २१० पैकी निम्मे कला शिक्षक तसेच ७३२ पैकी अर्धे शारीरिक शिक्षक बेरोजगार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभरातच कला शारीरिक शिक्षकांमध्ये शासनाच्या या निर्णयाविरुद्ध असंतोष खदखदत आहे.
 
एकीकडे क्रीडा युवक सेवा संचालनालयाने २०२० च्या आॅलिम्पिकचे उद्दीष्ट पुढे ठेऊन क्रीडा शिक्षकांचे राज्य जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. दुसरीकडे शिक्षण विभागाने शारीरिक शिक्षकांच्या भवितव्यावरच कुऱ्हाड चालवली. या दोन्ही विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे क्रीडा शिक्षकांपुढे बेरोजगारीचे संकट उभे ठाकले असल्याच्या प्रतिक्रिया जिल्हा महानगर शारीरिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. खेळाडू हे शाळेतच घडत असतात. देशासाठी उत्तम खेळाडू घडवण्याचा मान हा क्रीडा शिक्षकांचाच आहे. असे असताना राज्याचे क्रीडा शिक्षण मंत्री विनाेद तावडे यांनी गेल्या दोन वर्षांत शारीरिक शिक्षकांसोबत एकही बैठक घेतली नाही. त्यामुळे त्यांना क्रीडा शिक्षकांचे महत्त्वही कळले नाही. याचा परिणाम असा झाला की त्यांनी कला शा. शिक्षकांचे फारसे महत्त्व नसल्याचे स्वत:च ठरवून त्यांच्या तासिका कमी केल्या अन् याबाबत अध्यादेशही जारी केला. वास्तविकत: कला क्रीडा शिक्षक हे कोणत्याही शाळेच्या यशाचा महत्त्वाचा दुवा असतात. त्यांच्याबाबत असे उदासीन धोरण योग्य नसल्याचे मत बहुतांश पालकांनी व्यक्त केले आहे.
 
शारीरिकशिक्षकांच्या दैनंदिन कामांची यादी : प्रार्थनेच्या१५ मिनिटांपूर्वी शाळेत हजर होणे, प्रार्थन सुरू होईपर्यंत मैदानावर लक्ष ठेवणे, प्रार्थना राष्ट्रगीत घेणे, परिपाठाचे संचालन करणे, रांगेत विद्यार्थी वर्गात जातील याकडे लक्ष देणे, गणवेश नसणाऱ्या विद्यार्थ्यांना कारण विचारणे, उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद ठेवणे, त्यांना विचारणा करणे, शिक्षक सुटीवर असल्यास पहिली, दुसरी तासिका व्यस्त करणे, हरवलेले सापडले विभाग सांभाळणे, प्रथमोपचार तज्ज्ञ म्हणून शाळेत आजारी विद्यार्थी वर्गावर उपचार करणे, आजारी विद्यार्थ्याच्या घरी फोन करणे, आजारी विद्यार्थ्यांना डाॅक्टरकडे नेणे, घरी पोहोचवून देणे, विद्यार्थ्यांना वर्गात उंचीनुसार बसविण्यास वर्ग शिक्षकांना मदत करणे, वर्गासह मैदानावर वाद, भांडण किंवा मारामारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगणे, प्रसंगी रागावणे, शिस्त पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे त्यांची तक्रार करणे, शालेय कार्यक्रमाची तयारी करणे, शालेय उत्सवासह स्नेहसंमेलन राष्ट्रीय सणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे, मधल्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे, पोषण आहाराचे वाटप करणे, शालेय परिसरात स्वच्छता राखणे, परीक्षेसाठी वर्गांना नीट करणे अशी अनेक कामे शा. शिक्षकांना करावी लागतात.

शासनाची उदासीनता
तासिका वाढवण्याऐवजी कमी केल्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून निम्मे कला क्रीडा शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. कला क्रीडा शिक्षकांबाबत राज्य शासन कमालीचे उदासीन असल्याचेच हे द्योतक आहे. या तुघलकी निर्णयाविरुद्ध आम्ही जोरदार आंदोलन करणार आहोत.’’
- नरेंद्र मोहोड, जिल्हाध्यक्ष, राज्य कला अध्यापक संघ महामंडळ.
 
विद्यार्थींवर वाढेल ताण
लाखो विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर येऊन आठवड्यातून किमान चारवेळा स्वयं हालचालीतून मानसिक ताण हलका करण्याची संधी मिळायची. ती या निर्णयामुळे हिरावली गेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेही विद्यार्थी हे फारसे पुस्तक, मोबाईलबाहेर येईनासे झाले आहेत.’’ संदीप इंगोले, सदस्य महानगर शा.शि.संघटना, अमरावती.
 
समन्वयाचा अभाव
क्रीडा संचालनालयशिक्षण विभाग या दोन्हीही खात्यांच्या आपसात समन्वयाअभावी शारीरिक शिक्षकांचे महत्त्व शिक्षण विभागाने कमी केलेे आहे. एकीकडे आॅलिम्पिक खेळाडू घडवण्याच्या तयारीत क्रीडा संचालनालय असताना शिक्षण विभागाने शारीरिक शिक्षक कमी करण्याच्या मागे लागले आहे.''
- डाॅ.नितीन चवाळे, सचिव जिल्हा शा. शि. क्रीडा विषय समिती,अमरावती.
 
संग्रहित
- जिल्ह्यातील कलाशिक्षक : २१०
- जिल्ह्यातीलशा.शिक्षक : ७३२
- एकूणकलाशारीरिक शिक्षक : ९४२
- यापैकीबेरोजगारहोण्याची शक्यता : सुमारे ४५०
- शासनानेवाढवलेल्याखेळांची संख्या : ९० च्या वर
बातम्या आणखी आहेत...