आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीच्या अपघातात 5 गंभीर; 15 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: बसचे अॅक्सल तुटून झालेल्या अपघातात बसची अशी अवस्था झाली होती. घटनास्थळी पंचनामा करताना पोलिस.
परतवाडा - परतवाड्यावरून चिखलदरामार्गे माखला चुर्नी येथे जाणाऱ्या एसटी बसला सोमवार, जानेवारीला दुपारी चार वाजता घटांगजवळ अपघात झाला. गाडीचे अॅक्सल तुटल्याने गाडी पुलावरून कोसळून झालेल्या या अपघातात पाच जण गंभीर जखमी, तर १५ जण किरकोळ जखमी झालेत. जखमींना चिखलदरा अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले, तर चौघांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, परतवाडा आगाराची बस (एमएच ४०/८१४२) दुपारी दोन वाजता परतवाडा-चिखलदरामार्गे चुर्नीसाठी निघाली होती. बसमध्ये एकूण २१ प्रवासी होते. घटांगजवळ बसचे अॅक्सल तुटल्याने बस पंधरा फूट उंच पुलावरून खाली कोसळली. त्यात पाच प्रवासी गंभीर, तर १५ प्रवासी किरकोळ जखमी झालेत. मोतीराम बाबू दहीकर (२८), उमेश नंदू तोटे (२९), (दोघेही रा. सलिता), दिव्या रामू येवले (९), फुला रामसू येवले (३०) सलोना, विशाल येवले (४) (तिघेही रा. सलोना), भीमराव वांगे (१८) रा. मोर्शी, गाडीचा वाहक शिवचरण रामलाल चंदेले (४८), रणकलाल भामरे (७०) रा. माखला, अशोक मावस्कर (५०) रा. शिरजगाव, सुभिया हरगुडे (६८) रा. जामली, मुन्नीबाई नाराणय येवले (६०) रा. मसोंडी, अशोक मनघटे, अशोक कासदेकर अशी जखमींची नावे आहेत. यांपैकी सुभिया हरगुडे, मुन्नीबाई येवले, अशोक मनघटे अशोक कासदेकर यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परतवाडा चिखलदऱ्यातून खासगी तसेच शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. चालक क्षीरसागर वाहक चंदेले यांनाही दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच चिखलदरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तपास पोलिस करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...